आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 व्यक्ती विशेष

पिंपरी चिंचवडमध्ये आज ‘पॉवर गेम’.. शरद पवार-अजित पवार गटांचे मेळावे

शरद लाटे  41   17-06-2025 13:20:01

पुणे- पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जातो. महापालिका निवडणुकीत हा गड राखण्यासाठी राष्ट्रवादीतील शरद पवार आणि अजित पवार गटांचे वेगवेगळे मेळावे मंगळवारी (दि.१७) शहरात होणार आहेत. यानिमित्ताने दोघेही पवार- काका पुतणे शहरात येणार आहेत.

पिंपरी चिंचवड शहरावर एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. २०१७ मध्ये राष्ट्रवादीचा हा गड भाजपने उद्ध्वस्त केला. महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आली. दरम्यान, अडीच वर्षापूर्वी राष्ट्रवादी फुटली आणि अजित पवार गट भाजपबरोबर गेला. आता महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी दोन्ही राष्ट्रवादीचे मेळावे आहेत. शरद पवार गटाचा मेळावा ताथवडे येथे सकाळी अकराला होणार आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे व डॉ. अमोल कोल्हे उपस्थित राहतील. अजित पवार गटाचा मेळावा भोसरीत सायंकाळी चारला होईल. त्यावेळी अजित पवार उपस्थित राहतील.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटात दाखल झालेले स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह २८ जणांचा गट मंगळवारी पुन्हा स्वगृही परतणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, याबाबत कोणीही अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. दुसरीकडे अन्य पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे शरद पवार गटात प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.