शरद लाटे 143 04-02-2025 09:26:12
पुणे पुना गोल्फ लीग चे यावर्षी पुण्यातील येरवडा गोल्फ कोर्स येथे दिमाखदार असे आयोजन करण्यात आले होते .या राष्ट्रीय गोल्फ स्पर्धेला देशभरातील अनेक खेळाडू आणि त्यांचे संघ मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
या गोल्फ लीग मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे अपवादात्मक योगदानाबद्दल अर्किन पाटील* – गोल्ड डिव्हिजनचे प्रतिनिधीत्व करत त्यांनी सन्मान मिळवला.मनप्रीत, एबी आणि जीजीच्या जग्वार्स चे,आर्किन पाटील चे अतुलनीय कौशल्य आणि संयम दाखवला, ज्यामुळे तो लीगच्या मुख्य विभागात त्याच्या संघाची प्रमुख सर्वोत्कृष्ट खेळाडू बनला.
या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरले ते पुण्याचे आशुतोष लिमये ,त्यांनी उपविजेता पदक मिळवित पुना गोल्फ लीग च्या संघाचे वर्चस्व टिकवले. मनप्रीत, एबी आणि जीजीच्या जग्वार्समधील आणखी एक स्टार, कांस्य विभागात आशुतोषची उत्कृष्ट कामगिरी त्याच्या संघाच्या यशात मोलाची ठरली.
या वेळी विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. संघाचे मालक मनप्रीत उप्पल,अमित बोरा,आणि गौरव गाढोके यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी पुन्हा गोल्फ क्लब चे कप्तान इक्रम खान यासह देशभरातील विविध संघाचे प्रायोजक ,कॅप्टन आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आशुतोष लिमये यांनी काश्य पदक मिळवित पुण्याचे वैभव वाढवल्याची प्रतिक्रिया क्रीडा रसीकांडून व्यक्त होत आहे .