आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 महाराष्ट्र

पद्मश्री जयमाला शिलेदार जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन

अजिंक्य एकाड   207   14-08-2025 10:35:15

पद्मश्री जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मराठी रंगभूमि, पुणे आणि गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षभर विविध वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. नाट्य रसिकांसाठी हा कार्यक्रम परवणी ठरणार आहे.

जयमाला शिलेदार यांनी मराठी रंगभूमीची सेवा करण्याची सुरुवात 1942 पासून केली. संगीत शाकुंतल, संगीत सौभद्र, संगीत एकच प्याला, संगीत शारदा अश्या अनेक अजरामर नाटकांमध्ये त्यांनी भूमिका सादर केली.संगीत रंगभूमीची परंपरा जतन करणे आणि त्याच वेळी नाविन्याचा शोध घेत राहणे असा त्यांचा जीवनप्रवास आहे. संगीत नाटक पुढील पिढीकडे पोहोचण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. त्यांच्या याच कार्यामुळे त्यांची चौथी पिढी आता नाटक क्षेत्राकडे वळत आहे. जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांच्या कारकीर्दीला वंदन करण्यासाठी वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजी 'स्वरमाऊली जयमाला' या ध्वनीचित्रफीतीच्या उ‌द्घाटनाने होणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ५:३० वाजता ज्योत्स्ना भोळे सभागृह, टिळक रोड येथे आयोजित करण्यात आला आहे. ध्वनीचित्रफीतीचे उ‌द्घाटन ज्येष्ठ नाट्य-चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून डॉ. किरण ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.हा उद्घाटन समारंभ सर्वांसाठी खुला आहे.

नाट्य रसिकांना संगीत नाट्याचे सौंदर्य अनुभवण्यासाठी दर महिन्याला एक असे वर्षभर विविध सांगितीक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. तो राजहंस एक, अष्टनायिका, अंबरी जोवरी शशीरवि, नाट्य सौरभ, तालबंधातली ठेव ही, रंगभाषा, लोकधारा, पदरचना विस्मयकारक असे विविध कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.अशी माहिती जयमालाबाई शिलेदार यांच्या कन्या, मराठी रंगभूमि, पुणे आणि गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्टच्या अध्यक्षा दीप्ती शिलेदार-भोगले यांनी पत्रकार परिषदेत दिली या प्रसंगी संस्थेच्या विश्वस्त वर्षा जोगळेकर, निनाद जाधव उपस्थित होते.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.