भारतीय जनता पक्षाला तेलंगणात सर्वात मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे आमदार टी राजा सिंह यांनी पक्षाचा तडकाफडकी राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे तेलंगणाच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. आमदार टी राजा सिंह यांनी पक्षाचा का राजीनामा दिला? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.