हरियाणातील प्रसिद्ध उद्योजक प्रवीण मित्तल यांच्या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली. उद्योगासाठी बँकेकडून 20 कोटी रुपयांची कर्ज घेतल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून समोर आली. बँकेचे कर्ज फेडण्यासाठी कोणताही मार्ग शिल्लक राहिला नसल्याने त्यांनी सामूहिक आत्महत्या केली .
प्रवीण मित्तल यांचे कुटुंब पंचकुला येथे राहत होते. कर्जबाजारी झाल्यामुळे त्यांचे जीवन असह्य झाल्यामुळे त्यांनी ओळख लपवून रिक्षा चालवने सुरू केल होत.
कर्जाचा डोंगर वाढल्याने ते पंचकुला सोडून देहराडून ला गेले होते. गेल्या सहा वर्षापासून ते डेहराडून मध्ये स्थायिक होते या काळात प्रवीण मित्तल यांना आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा कोणताही मार्ग सापडला नाही. कर्ज वसुली करण्यासाठी बँकेने फ्लॅट आणि गाडी जप्त केली होती.
सोमवारी संपूर्ण कुटुंब बाबा बागेश्वरांच्या कार्यक्रमात गेले होते तिथून परतताना सर्व कुटुंबातील सदस्यांनी विष प्राशन केले. विष प्राशन केल्यानंतर प्रवीण मित्तल फूट पाथवरती 5 मिनिट बसून राहिले. यादरम्यान त्यांनी एका व्यक्तीला सांगितले की, आम्ही सर्वांनी विष प्राशन केले आहे सर्व नातेवाईक करोडपती आहेत पण कोणीही कर्ज फेडण्यासाठी मदत केली नाही.