आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

भाजप तालुकाध्यक्षाचा प्रताप! BMC मध्ये नोकरी लावतो सांगून ४.५० लाख रुपये उकळले; दिवेआगरमधून अटक!

शरद लाटे  577   28-11-2026 09:04:44

Pune 

मुंबई महापालिकेत लिपिक पदावर नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवून तरुणांकडून पैसे घेतल्याचा आरोप श्रीवर्धन तालुका भाजपचे अध्यक्ष तथा माजी सरपंच आशुतोष अंकुश पाटील यांच्यावर (Shrivardhan BJP president arrest news) आहे.

याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी गुरुवारी (ता. २६) सायंकाळी त्यांना दिवेआगर येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

मुंबईतील विलेपार्ले पोलिस ठाण्यात पाटील यांच्यासह अन्य आरोपींविरोधात गुन्हा दाखल आहे. मुंबई महापालिकेत लिपिक पदावर नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचा आरोप आहे. यासाठी तक्रारदार तेजस राजेश बारगडे, आकाश बारे आणि रोहित बारे या तिघांकडून प्रत्येकी दीड लाख रुपये घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तिघांकडून एकूण चार लाख ५० हजार रुपये घेण्यात आले, मात्र पैसे देऊनही त्यांना नोकरी मिळाली नाही.

रक्कमही परत करण्यात आली नाही. या प्रकरणात आशुतोष पाटील यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबईतील दिंडोशी येथील सत्र न्यायालयात अर्ज केला होता; मात्र, अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी हा अर्ज फेटाळला. आशुतोष पाटील हे भाजपचे तालुकाध्यक्ष आणि श्रीवर्धनचे माजी सरपंच असल्याने या प्रकरणाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. या घटनेमुळे श्रीवर्धनच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.