आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

शरद पवारांच्या NCP चं ठरलं, जितेंद्र आव्हाडांनी केलं जाहीर; 'सुप्रिया सुळे 8 खासदारांना घेऊन...'

शरद लाटे  21   27-11-2026 19:33:36

Pune 

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका कळीचा मुद्दा ठरणार आहे. केंद्र सरकारने अधिवेशन बोलावताच पवारांच्या राष्ट्रवादीनं तात्काळ पक्षाच्या खासदारांसाठी व्हिप जारी केला आहे.

संसदेच्या अधिवेशनात 30 नोव्हेंबरपासून 4 डिसेंबरपर्यंत लोकसभेत सर्व खासदारांनी उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचपार्श्वभूमीवर भाजपने अखेर डाव टाकला असून, डिलिमिटेशन बिलसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची थेट शरद पवारांशी चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यातच आता शरद पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना हे जाहीर केलं आहे. शरद पवारांची रुग्णालयात भेट घेतल्यानंतर बोलताना त्यांनी ही माहिती दिली. याआधी अधिवेशनाचा अजेंडाच माहीत नाही असं म्हणत विधेयक समोर आल्यावर पक्ष निर्णय घेईल असं खासदार सुप्रिया सुळेंनी सांगितलं होतं.

सुप्रिया सुळे यांनी 8 खासदारांना सोबत घेऊन निर्णय घेतला असून तो अंतिम आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे. "डिलिमिटेशनची चर्चा सुरुही झाली नव्हती, तेव्हा मला साहेबांनी अनौपचारिकपणे सांगितलं होतं की, ते संविधानिक असून ते करावं लागतं, त्याला पर्याय नाही. आपापले मतदारसंघ बांधायला शिका. किती दिवस हे चालणार. मी तर नेहमी सांगतो की शरद पवार माझे दैवत असून दैवताची भूमिका तीच माझी भूमिका आहे. आठ खासदारांना घेऊन सुप्रिया सुळेंनी निर्णय घेतला असून तो अंतिम आहे. डिलिमिटेशनला पाठिंबा देणार असल्याचं ठरलं आहे".

डिलिमिटेशन अर्थात परिसीमनाच्या मुद्द्यावर दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशनच बोलावलं आहे. 30 नोव्हेंबरपासून संसदेचं कामकाज सुरू होणार आहे. या अधिवेशनात महिला आरक्षण आणि परिसीमनाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक पुन्हा मांडलं जाणार आहे. एप्रिलमध्ये याच विधेयकावर सरकारला बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. दरम्यानच्या काळात राजकीय समीकरणे बदलली आणि सरकारने पडद्यामागे हालचाली करत आकडा जुळवल्याचे बोलले जात आहे

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.