आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Pimpri drowning news: मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू

नितीन देशपांडे   100   27-11-2026 16:40:28

Pune 

घराजवळील शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या मामा-भाच्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. कुटुंबीयांनी दोघांना पाण्याबाहेर काढून तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

ही घटना बुधवारी (दि. २५) सायंकाळी सातच्या सुमारास मोशी येथील बनकरवस्ती येथे घडली.

सिद्धांत उत्तम लगाडे (वय २१) आणि रितेश रमेश ताकपेरे (१२, दोघेही रा. बनकरवस्ती, मोशी) अशी मृत्युमुखी पडलेल्या मामा-भाच्याची नावे आहेत. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिस निरीक्षक भोजराज मिसाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धांत हा रितेशचा मामा होता. बुधवारी दोघेही घराजवळ असलेल्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना दोघेही पाण्यात बुडाले. याबाबत माहिती मिळताच कुटुंबीयांनी शेततळ्याकडे धाव घेतली.

पोलिस निरीक्षक भोजराज मिसाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धांत हा रितेशचा मामा होता. बुधवारी दोघेही घराजवळ असलेल्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना दोघेही पाण्यात बुडाले. याबाबत माहिती मिळताच कुटुंबीयांनी शेततळ्याकडे धाव घेतली.

सिद्धांत आणि रितेश या दोघांनाही पोहता येत नव्हते. असे असतानाही दोघे घराजवळील शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले होते. दरम्यान, पाण्यात उतरल्यानंतर दोघेही बुडाले. कुटुंबीयांना याबाबत माहिती मिळेपर्यंत बराच उशीर झाला होता.

नव्याने तयार केलेले शेततळे जीवघेणे

घटनास्थळी असलेले आठ फूट खोल शेततळे अवघ्या दोन दिवसांपूर्वीच तयार करण्यात आले होते. घटनेच्या दिवशीच या शेततळ्यात पाणी सोडण्यात आले होते. मात्र, पहिल्याच दिवशी हे शेततळे मामा-भाच्यासाठी जीवघेणे ठरल्याने शोक व्यक्त होत आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.