Pune
पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट आवारात एका आरोपीवर जीवघेणा हल्ला झाला आहे. न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या मंदार किवळे याच्यावर 6 ते 7 हल्लेखोरांनी आधी गोळीबार केला आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार करत प्राणघातक हल्ला केला.
या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवली असून आत्तापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केली अन् स्पष्ट आदेश दिले आहेत.
अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत - मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुणे आणि मुंबईतील गोळीबार घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महासंचालकांकडे दोन्ही घटनांवर नाराजी व्यक्त केली असून 'अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत' असा स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलिस महासंचालकांकडे नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम काय म्हणाले?
पुण्यात झालेल्या घटनेतील गुन्हेगारांना अटक केली आहे. या घटनेतील संशयित आणि आरोपींना दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणात आता आगामी कारवाई करतील, असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलं आहे. घटना समोर आल्यानंतर ही सर्व पोरं कुठून आली होती? यांच्यावर आधी गुन्हे होते का? यावर मी माहिती मागिवली आहे. या प्रकरणाला आम्ही गांभीर्याने घेतलं आहे. पुणे वा इतर शहरात स्वत:ची दहशद माजवण्याचा प्रयत्न केला जातोय. यावर कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहे.
संशयित सर्व आरोपींना अटक
दरम्यान, या घटनेवरून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली असून या प्रकरणात आणखी कोणती माहिती समोर येतीये, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या घटनेतील संशयित सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. अक्षय चव्हाण, बाब्या पवार, यानप्या, रोहन कानगुडे, गणेश चव्हाण, अमोल रामचंद्र चव्हाण आणि गणेश सुभाष चव्हाण यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप होत आहे.