आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Additional Tehsildar Offices: फडणवीस सरकारचा धडाकेबाज निर्णय! राज्यातील 6 जिल्ह्यांत होणार नवीन अपर तहसीलदार कार्यालये

शरद लाटे  267   24-11-2026 13:12:09

Pune 

राज्यातील ग्रामीण भागातील प्रशासकीय कामकाज अधिक सोपे आणि वेगवान करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नागपूर आणि नाशिक विभागातील 6 जिल्ह्यांमध्ये नवीन अपर तहसीलदार कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात निर्णय घेतला असून महसूल विभागाने याबाबत शासन निर्णयही जारी केला आहे.

नवीन कार्यालये सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागातील नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित कामांसाठी दूरच्या कार्यालयांमध्ये जाण्याची गरज कमी होणार आहे. स्थानिक पातळीवरच प्रशासकीय सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला आहे.

8 ठिकाणी सुरू होणार नवीन कार्यालये

राज्यातील एकूण 8 ठिकाणी नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरू करण्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये चिंचोली खापरखेडा, घोट, सिन्नर, शिरपूर शहर, शहादा, जळगाव शहर, चाळीसगाव आणि पहूर या ठिकाणांचा समावेश आहे. या कार्यालयांच्या स्थापनेसाठी महसूल विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी नवीन कार्यालये सुरू करण्याच्या प्रक्रियेला चालना मिळणार आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा

सध्या अनेक ग्रामीण भागांतील नागरिकांना महसूलविषयक कामांसाठी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. यासाठी त्यांचा वेळ आणि प्रवासाचा खर्चही वाढतो. नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरू झाल्यानंतर नागरिकांना स्थानिक पातळीवर महसूलविषयक सेवा मिळण्यास मदत होईल. तसेच प्रशासकीय कामकाजाचा वेग वाढून ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी कमी होण्याची अपेक्षा आहे. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि सक्षम करणे, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.