आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

लिपिक, शिपाई, आरेखक पदे रद्द! राज्यातील १६,५०० कर्मचाऱ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह

नितीन देशपांडे   235   23-11-2026 06:45:07

जलसंपदा विभागाच्या सुधारित आकृतीबंधात कनिष्ठ लिपिक, शिपाई, आरेखक आणि अनुलेखक यांसारखी पदे मृत संवर्ग (डाइंग कॅडर) घोषित करून रद्द करण्याच्या शासन निर्णयाविरोधात जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

१९ मे २०२६ रोजी जारी झालेल्या या शासन निर्णयामुळे राज्यातील सुमारे १६ हजार ५०० कर्मचाऱ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भात लघु पाटबंधारे बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभागातील कर्मचारी आक्रमक झाले आहेत.

शासनाने मृद व जलसंपदा विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करताना काही पदे समर्पित करून मृत संवर्ग म्हणून घोषित केली आहेत. यात कनिष्ठ लिपिक, शिपाई, आरेखक, अनुलेखक यांसारख्या वर्ग तीन व वर्ग चारच्या पदांचा समावेश आहे. हा निर्णय घेताना कर्मचारी संघटनांना विश्वासात घेतले नाही, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

वरिष्ठांची पदे वाढवली, कनिष्ठांची संपवली!

‘कनिष्ठ लिपिक नसेल तर फाइल कोण चालवणार? शिपाई नसेल तर कार्यालय कोण सांभाळणार?’ असा संतप्त सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. या निर्णयामुळे नवीन भरतीचे मार्ग बंद होण्यासोबतच सध्याच्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या संधीही प्रभावित होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली.

भरतीबाबतही चिंता

संबंधित पदे रिक्त झाल्यानंतर ती आपोआप नष्ट होणार असल्याने, या निर्णयाचा भविष्यातील भरती तसेच कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीवरही परिणाम होणार असल्याची चिंता कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. शासनाने हा निर्णय मागे घेतला नाही, तर राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला.

कनिष्ठ लिपिक नसेल तर फाइल कोण चालवणार? शिपाई नसेल तर कार्यालय कोण सांभाळणार?’ असा संतप्त सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. या निर्णयामुळे नवीन भरतीचे मार्ग बंद होण्यासोबतच सध्याच्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या संधीही प्रभावित होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली.

भरतीबाबतही चिंता

संबंधित पदे रिक्त झाल्यानंतर ती आपोआप नष्ट होणार असल्याने, या निर्णयाचा भविष्यातील भरती तसेच कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीवरही परिणाम होणार असल्याची चिंता कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. शासनाने हा निर्णय मागे घेतला नाही, तर राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.