आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

उप महाराष्ट्र केसरी पै. विशाल आप्पा कलाटे यांची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव!

शरद लाटे  308   20-11-2026 14:23:45

भाजपा स्वीकृत नगरसेवकपदी जयनाथ काटे, सचिन साठे, विशाल कलाटे, कुलदीप परांडे, ऋषिकेश म्हेत्रे, राजेश पिल्ले, कुणाल लांडगे यांच्या नावांची घोषणा!

पिंपरी-चिंचवड : कुस्तीच्या आखाड्यात आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर उप महाराष्ट्र केसरी हा मान मिळवणारे पै. विशाल आप्पा कलाटे यांची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे क्रीडा क्षेत्रासह सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कुस्तीच्या आखाड्यात मेहनत, जिद्द, चिकाटी आणि संघर्षाच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या विशाल आप्पा यांनी आता सामाजिक आणि सार्वजनिक जीवनातही आपली छाप उमटवली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत मिळालेली स्वीकृत नगरसेवकपदाची जबाबदारी ही त्यांच्या आजवरच्या वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात आहे.

क्रीडा क्षेत्रातील अनुभव, जनसंपर्क आणि सामाजिक कार्याची आवड यांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी ते निश्चितच प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.