आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

बिअर प्यायल्याने शरीरावर होतात 'हे' परिणाम! आरोग्याबाबत जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

नितीन देशपांडे   46   20-11-2026 13:17:06

Pune 

अनेक तरूण थंडगार बिअर पिण्याला पसंती देतात. बिअर प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि तहान भागते असा अनेकांचा मोठा समज आहे. तर बिअर पिल्याने शरीराला पोषक घटक मिळतात.

मिनरल्स, व्हिटॉमिन मिळतात असाही दावा करण्यात येतो. पण तज्ज्ञांनी हे सर्व दावे फेटाळले आहेत. उन्हापासून बचावासाठी आणि तहान भागवण्यासाठी बिअर पिणे फायदेशीर असल्याचे समज सपशेल खोटा असल्याचे तज्ज्ञ सांगतात. उलट बिअर पिल्याने शरीराला हानी पोहचते असा तज्ज्ञांचा दावा आहे.

बिअर पिण्याचे शरिराला तोटे

बिअर पिल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते, असा गैरसमज आहे. बिअरमध्ये अल्कोहल असते. जे शरीराला आतून कोरडे करते, शरीरात डिहायड्रेशन वाढते. बिअर प्यायल्यानंतर शरीरात पाणी साठत नाही. ते बाहेर पडते. बिअरमध्ये मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असल्याचा काही जण दावा करतात. तर काही जण बिअर ही आरोग्यदायी असतात असाही तर्क लढवतात. पण बिअर आरोग्यदायी समजून पिणे योग्य नसल्याचे डॉक्टर सांगतात. उन्हाळ्यात अथवा दमट वातावरणात बिअरऐवजी साधे पाणी, लिंबू पाणी अथवा ताज्या फळांचा रस घेणे सर्वोत्तम ठरते.

बिअर पिण्याचे मोठे दुष्परिणाम

बिअरमधील अल्कोहोल शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाईट्स बाहेर काडते. यामुळे तहान अधिक वाढते. शरीरात पाण्याची मोठी कमतरता निर्माण होते.

बिअरमध्ये कॅलरीजचे प्रमाण अधिक असते. नियमितपणे बिअर पिल्यास पोटाची चरबी आणि वजन वाढण्याचा धोका अधिक असतो.

बिअर प्यायल्याने शांत झोप लागते हा अजून एक गैरसमज आहे. पण प्रत्यक्षात बिअर प्यायल्याने नैसर्गिक झोपेचे चक्र बिघडते.

सातत्याने बिअरचे सेवन केल्यास यकृतावर , लिव्हरवर दुष्परिणाम होतो. त्याचे गंभीर परिणाम दिसू लागतात.

बिअर सेवन केल्याने अपचन, गॅस, पोट फुगणे आणि इतर आजार जडतात. पोटाच्या समस्या वाढण्याची शक्यता असते.

डिस्क्लेमर: ही माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने देण्यात आली आहे. मद्यपान आरोग्यास हानिकारक असते. आरोग्यविषयक निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.