आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

खडकवासला धरणातील प्रदूषणाचा गंभीर प्रश्न नगरसेविका धनश्रीताई कोल्हे यांनी सभागृहात उपस्थित केला!

शरद लाटे  424   18-11-2026 12:07:50

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत पर्यावरण संवर्धनाच्या विषयावर चर्चा सुरू असताना नगरसेविका धनश्रीताई कोल्हे यांनी खडकवासला धरणातील प्रदूषणाचा गंभीर प्रश्न उपस्थित केला.

खडकवासला धरण परिसरातील हॉटेल्स आणि फार्महाऊसचे सांडपाणी धरणात सोडले जात असल्याचा मुद्दा त्यांनी सभागृहासमोर मांडला. धरणातील पाणी दूषित होत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून, या प्रकाराची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी. सांडपाणी सोडणाऱ्यांची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

 

यावेळी त्यांनी पुणे शहराच्या शाश्वत विकासासाठी केवळ रस्ते आणि इमारतींचे बांधकाम पुरेसे नसून स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि हिरवळ टिकवणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले.

 

तसेच शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे, ओला-सुका कचरा वर्गीकरण १०० टक्के करणे, बांधकामांच्या ठिकाणी धूळ नियंत्रणासाठी उपाययोजना करणे, बांधकाम साईटवर डस्ट कंट्रोल यंत्रणा बसवणे, महापालिकेच्या शाळा व कार्यालयांवर रुफ टॉप सोलर आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्याच्या सूचना त्यांनी मांडल्या.

शहरातील नाले आणि नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन, स्वच्छता आणि प्रदूषण नियंत्रणासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

पुणे शहराचा विकास पर्यावरणपूरक असावा, नागरिकांना स्वच्छ हवा व शुद्ध पाणी मिळावे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी हरित पुणे निर्माण व्हावे, यासाठी धनश्रीताई कोल्हे यांनी सभागृहात विविध महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.