Pune
श्रीकांतशिंदेयांनीतेमाझ्यापर्यंतपोहचवलेअशीदिल्लीतभाजपच्यानेत्यांतकुजबुजआहे. खरंकायतेसांगा, नाहीतरमलाखोलात जावं लागेल , असा इशारा देत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 500 कोटींचा बॉम्ब फोडला .
बीडच्या नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे दसरा संमेलन झाले. यावेळी जरांगे यांनी मराठा आरक्षण, दुष्काळी मदत, शेतकरी कर्जमाफी आदी मुद्दय़ांवर सडेतोड भाष्य करत महायुती सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. विशेष म्हणजे, दोन ते अडीच वर्षांपूर्वीची घटना अलीकडेच आपल्या कानावर आल्याचे सांगत जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरू असलेल्या राजकारणावर हल्ला चढवला.
जरांगे म्हणाले, एकनाथ शिंदे तुम्ही माझ्याबद्दल भाजपच्या लोकांना खोटं सांगितलं. जरांगेंना 500 कोटी रुपये द्यायचे आहेत आणि ते 500 कोटी रुपये तुम्ही घेऊन मला दिलेत, अशी कुजबुज भाजपचे नेते करत आहेत. जरांगे आपला थर्ड पर्सन आहे असं तुम्ही भाजपला म्हणाला आहात का? तुम्ही खरोखरच मला पैसे दिले असतील तर हो म्हणा आणि नसतील दिले तर तेही शिंदेंनी जाहीरपणे उद्यापर्यंत सांगावे, असे आव्हान जरांगे यांनी दिले.
माझ्याहाकेवर 2,500 कोटीउभेराहतील
'अरे, 500 कोटी म्हणजे किती होतात माहिती आहे का? दोन एकरचे शेततळे भरून जाईल एवढी ती रक्कम आहे. मी स्वतः 5,000 रुपये कधी एकत्र पाहिले नाहीत. माझ्या समाजाने आंदोलनात 3 ते 4 हजार कोटी रुपयांची तर केवळ फुले उधळली असतील. माझ्या एका हाकेवर समाजाने 100-100 रुपये दिले तरी 2,500 कोटी उभे राहतील, असा टोला जरांगे यांनी यावेळी लगावला.
मलासंपवण्यासाठीगुप्तचर्चा
मला कसे संपवायचे यासाठी अनेक कट कारस्थाने रचण्यात आली. याबाबत एका माजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 40 मिनिटांची गुप्त चर्चा झाली. त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. वेळ आल्यावर ते जनतेसमोर ठेवीन. 40 मिनिटांची ऑडिओ क्लिप माझ्याकडे आहे. माझ्या विरोधात कारस्थान रचणाऱ्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा जरांगे यांनी दिला.
दोनमहिन्यांनंतरपळताभुईथोडीहोईल
मी तीन महिने नेत्यांवर बोलणार नाही असा शब्द दिला होता. त्याला आता एक महिना पूर्ण झाला असून दोन महिने बाकी आहेत. मी शब्दाचा पक्का आहे म्हणून सध्या शांत आहे, नाहीतर पंस मामाला सर्वात जास्त धुतले असते. मात्र दोन महिने संपल्यानंतर मी एक पाऊल पुढे टाकून असा बाजार उठवणार की यांना पळता भुई थोडी होईल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
मराठाकुणबीनोंदींसाठीहेल्पलाईन
मराठा आणि कुणबी समाजाच्या अडचणी तत्काळ सोडवण्यासाठी आणि आंदोलनाची रचना मजबूत करण्यासाठी 22 तारखेला तीन स्वतंत्र हेल्पलाईन नंबर सुरू करण्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली. पहिला मराठा सेवक नोंदणासाठी. कुणबी दाखले व एसईबीसी अडचणी आणि मराठा बांधवांच्या सर्व कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणींसाठी असे तीन स्वतंत्र हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात येणार आहेत.
मराठय़ांनामोठंकरण्याऐवजीतुम्हीघरंभरली
आम्हीमराठेकोणाच्याचजिवावरनाही, आम्हीआमच्याचजिवावरआहोत, हेआपणदाखवूनदिले. तुमच्याहातातसत्ताहोती. तुम्हीमराठासमाजमोठाकरायलाहवाहोता. तुम्हीतुमचीघरंभरली, तुम्हीबंगलेबांधले, जमिनीघेतल्या. मराठय़ांच्याविरोधातजाणाऱ्यांना 2029 लानिवडूनयेऊद्यायचेनाही, असेजरांगेम्हणाले.
मीतुमचानोकरनाही
त्यांचे म्हणणे आहे की, आम्ही म्हणतो तसे वागा. आम्ही आरक्षण दिले, यापुढे दिले नाही तर आमच्याविरोधात भांडू नका. माझ्याकडून असं कसं होईल? मी माझ्या समाजासाठी भांडायचं नाही का? मी माझ्या समाजासाठी मागणी करायची नाही? मग मी माझ्या समाजाशी धोका करतोय त्याचा अर्थ असा होतो. तुमचं ऐकायला मी तुमचा नोकर नाही, असे जरांगे यांनी ठणकावले.