आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Gokul Election Result LIVE: मतदारांना आई यल्लमाच्या परडी भंडाऱ्याची शपथा घ्यायला लावणाऱ्या हसन मुश्रीफांना जबर दणका; मुश्रीफांचा दारुण पराभव

शरद लाटे  38   19-10-2026 16:59:57

Pune 

गोकुळच्या निवडणुकीमध्ये आमदार सतेज पाटील यांनी अभूतपूर्व इतिहास घडवताना एक हाती सत्ता मिळवली आहे. 25 जागांपैकी जवळपास 14 जागांवर विजय खेचून आणताना सतेज पाटील यांनी महायुतीला अक्षरशः धोबीपछाड दिला.

गेल्या दोन महिन्यांपासून गोकुळची यंत्रणा एक हाती राबवताना सतेज पाटील यांनी महायुतीला अक्षरशः सळो की पळो करून सोडले होते आणि या निकालाचे परिणाम आता मतदानात दिसून आले आहेत. या निवडणुकीमध्ये अनेक रथी महारथी महायुतीकडून उभे होते. मात्र, या सर्वांना धोबीपछाड देत सतेज पाटील यांच्या आघडीने विजय मिळवून आणला. त्यामुळे विश्वास आबा पाटील, अरुण डोंगळे, नविद मुश्रीफ, शौमिका महाडीक अशा दिग्गजांना या निवडणुकीमध्ये दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे.

नविद मुश्रीफ यांचा दारुण पराभव

महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे होते. त्यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ गोकुळचे चेअरमन होते. त्यांना सुद्धा पराभवाचा दणका बसला आहे.मुश्रीफ यांना आई यल्लमाची भीती घालत मतदारांना मत द्यायला भाग पाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मुश्रीफ यांच्या अंधश्रद्धेला दणका देण्याचं काम दूध उत्पादकांनी केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांकडून 25-0 असा दावा करण्यात येत होता. इतकेच नव्हे तर 90 टक्के ठराव आमच्याकडेच आहेत, फक्त विजयाची औपचारिकता बाकी आहे, आज मतदान, उद्या गुलाल आम्ही उधळणारच आहोत अशा वल्गना सुद्धा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आल्या होत्या. मात्र, निवडणुकीतील अंडरकरंट हा महायुतीला समजला नसल्याचा या निकालातून स्पष्ट झाला आहे. सतत विजयाचा दावा केला जात असताना गोकुळसाठी काय करणार हे सांगण्यापेक्षा सुद्धा गोकुळच्या मतदारांना धमकावण्याचा प्रयत्न सातत्याने महायुतीच्या नेत्यांकडून झाला होता.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.