Pune
एमपीएससी आयोगामार्फत घेण्यात आलेल्या गेल्या काही परीक्षांमध्ये मोठा गोंधळ पहायला मिळाला होता. त्यानंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं. एमपीएससीचे अध्यक्ष भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीला सुरुवात झाली.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात पुण्यामध्ये एमपीएससी परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन उभारलं. अखेर या आंदोलनानंतर या प्रकरणात एका चौकशी समितीची स्थापना करण्यात आली. या चौकशी समितीच्या सचिवपदी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती देखील करण्यात आली. मात्र आता याबाबत तुकाराम मुंढे यांनी मोठा खुलासा केला आहे.
नेमकं काय म्हणाले मुंढे?
एमपीएससी प्रकरणाच्या चौकशी आयोगात माझा सहभाग असल्याबाबत माझ्याकडे कोणतीही अधिकारिक माहिती नसल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. शाब्दिक चर्चा झालेली आहे ,मात्र त्यांचं नाव सांगता येणार नाही. मात्र अधिकृतरित्या मला त्याबद्दल काहीही सांगितलेलं नाही, असा मोठा खुलासा याबाबत तुकाराम मुंढे यांनी केला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
एमपीएससी आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये सुरू असलेल्या गोंधळावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी पुण्यामध्ये एमपीएससी आयोगाच्या विरोधात मोठं आंदोलन सुरू केलं होतं. एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. रोहित पवार यांच्या या आंदोलनात हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते.
दरम्यान त्यानंतर अखेर सरकारकडून या आंदोलनचाी दखल घेण्यात आली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका समितीची स्थापना करण्यात आली. या चौकशी समितीच्या सचिवपदी एफडीचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची निवड करण्यात आली. परंतु यावर बोलताना आता तुकाराम मुंढे यांनी मोठा खुलासा केला आहे. एमपीएससी प्रकरणाच्या चौकशी आयोगात माझा सहभाग असल्याबाबत माझ्याकडे कोणतीही अधिकारिक माहिती नसल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. केवळ शाब्दिक चर्चा झालेली आहे, असा खुलासा त्यांनी यावेळी केला आहे,