आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

राज्य सरकारचा ४४ नव्या गाड्या खरेदीचा निर्णय! ४ कोटींची लँड क्रुझर, ३२ इनोव्हा अन् २ फॉर्च्युनर चर्चेत

शरद लाटे  142   13-10-2026 17:04:04

Pune 

महाराष्ट्र सरकारकारने व्हीआयपी अतिथींसाठी नव्या गाड्यांची खरेदी (Purchase of new vehicles) करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. तब्बल 12.68 कोटी रुपयांच्या 44 गाड्या खरेदीसाठी मंजुरी देण्यात आली आहे.

यात सगळ्यात महागडी गाडी चार कोटी रुपयांची आहे. या निर्णयामुळे राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दुष्काळातही राज्य सरकारची वाहन खरेदी थांबत नसल्याचं चित्र

दुष्काळातही राज्य सरकारची वाहन खरेदी थांबत नसल्याचं पाहायला मिळत आहे. तब्बल 12 कोटी 68 लाख रुपयांच्या 44 वाहनांची खरेदीला मंजूरी दिली आहे. यात व्हीआयपी पाहुण्यांसाठी तब्बल चार कोटींची एक लँड क्रूजरची खरेदी करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये खर्च वाचवा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असतानाही वाहन खरेदी केल्याने मोठी टीका होत आहे. दौऱ्यावर आलेल्या व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी ही वाहन खरेदी करण्यात आली आहे.

1) टोयोटा इनोव्हा क्रिस्टा (डिफेन्स/डिझेल): 32 वाहने (प्रत्येकी किंमत अंदाजे 20.71 लाख रुपये).

2) टोयोटा फॉर्च्युनर (डिझेल - 4x2 Manual): 2 वाहने (प्रत्येकी किंमत 30 लाख रुपये).

3) टोयोटा लँड क्रुझर 300 (NIJ III/B6 लेव्हल प्रोटेक्शनसह बुलेटप्रूफ वाहन): 1 विशेष बुलेटप्रूफ वाहन (किंमत 4 कोटी 7 लाख 68 हजार रुपये).

4) मारुती सुझुकी एर्टिगा (पेट्रोल): 7 वाहने (प्रत्येकी किंमत 11.59 लाख रुपये).

5) टोईंग वाहन (TATA 207 YADHA): 1 वाहन (किंमत 9 लाख रुपये).

सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळा कोरडा गेला आहे. या काळात राज्यातील बहुतांश भागात पाऊस पडलेला नाही. त्यामुळं शेतकऱ्यांची उभी पिकं करपून गेली आहेत. त्यामुळं सरकारनं राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. अशातच आता राज्या सरकारने व्हीआयपी अतिथींसाठी नव्या गाड्यांची खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. तब्बल 12.68 कोटी रुपयांच्या 44 गाड्या खरेदीसाठी मंजुरी देण्यात आली आहे


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.