आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधू कांबीकर यांचे निधन

नितीन देशपांडे   121   12-10-2026 13:07:14

Pune 

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांच्या निधनानं मराठी प्रेक्षकवर्ग धक्क्यात असताना प्रेक्षकांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मराठी चित्रपट, नाट्यसृष्टी आणि लोककलेच्या विश्वात आपल्या अभिनयाचा , नृत्याचा अढळ ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी मधू कांबीकर यांचं निधन झालं आहे.

प्रदीर्घ आजारानं त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ७३ वर्षांच्या होत्या.

काही वर्षांपूर्वी मधू कांबीकर यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मधू कांबीकर यांच्या निधनानं मराठी सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

मधू कांबीकर यांचा कलाप्रवास अत्यंत प्रेरणादायी आणि थक्क करणारा होता. लोककलेच्या माध्यमातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करून त्यांनी मराठी सिनेमा आणि नाटकांमध्ये आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

बालपण आणि लोककलेचा वारसा

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माळेगाव इथ जन्मलेल्या मध कांबीकर यांना लहानपणापासूनच लोककलेचे बाळकडू मिळालं. कोल्हाटी समाजातील कलापरंपरेचा भाग असल्यानं त्यांनी वयाच्या अतिशय लहान वयात रंगमंचावर पाऊल ठेवलं. लावणी आणि तमाशा या महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककला प्रकारांना त्यांनी नव्या उंचीवर नेऊन ठेवलं.

लोककलेच्या व्यासपीठावरून सुरु झालेला हा प्रवास पुढं नाटक आणि चित्रपटांपर्यंत विस्तारला. त्यांनी आपल्या चार दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत ७५ हून अधिक चित्रपटांत आणि अनेक गाजलेल्या नाटकात काम केलं.

गाढवाचं लग्न, विच्छा माझी पूरी करा, वस्त्रहरण, काशी मी राहू तशीच, अजब न्याय , शापित, झपाटलेला, माझा छकुला, बिनकामाचा नवरा, एक होता विदूषक, मुक्ता, अशा अनेक सिनेमांत त्यांनी भूमिका साकारल्या.

शापित चित्रपटातील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना फिल्मफेअर (मराठी) पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारानें गौरवण्यात आलं होतं. याशिवाय २०१८ मध्ये त्यांना मराठी सिनेसृष्टीतील अमूल्य योगदानाबद्दल 'झी चित्र गौरव जीवनगौरव पुरस्कार' देण्यात आला.

२०१६ ची दुर्दैवी घटना आणि आजारपण

२७ नोव्हेंबर २०१६ रोजी मुंबईतील 'यशवंत नाट्यमंदिर' इथं आयोजित 'लावण्य संगीत' या कार्यक्रमात सादरीकरण करत असताना त्यांची प्रकृती बिघडली. जवळपास १२ वर्षांनंतर त्या मंचावर लावणी सादर करत होत्या. अत्यंत जिद्दीनं त्यांनी आपलं सादरीकरण पूर्ण केलं, पण कार्यक्रमानंतर त्यांना अर्धांगवायूचा (पॅरालिसिस) झटका आला. तेव्हापासून त्या अभिनय क्षेत्रापासून दूर असून घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.