आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

तुकाराम मुंढेंच्या कारवाईने खळबळ! पुणे कॅम्पमधील गार्डन वडापाव सेंटरमधून लाखोंचे खाद्यतेल जप्त

नितीन देशपांडे   85   11-10-2026 19:30:18

Pune 

FDA काळात सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यतेलाचा पुरवठा सुनिश्चित Pune FDA Action करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे शहरातील तीन आस्थापनांवर कारवाई करत ३,७५३.६ किलो खाद्यतेल जप्त केले.

या तेलाची किंमत सुमारे ७.९१ लाख रुपये आहे. कॅम्पमधील गार्डन वडापाव सेंटर, गुलटेकडी मार्केट यार्डमधील प्रज ट्रेडर्स आणि शुक्रवार पेठेतील श्री रामकृष्ण ऑइल मिल्स या आस्थापनांवर ही कारवाई करण्यात आली.

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेलाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतील २५ आस्थापनांमधून एकूण ७४,६१२.११ किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले. या तेलाची किंमत सुमारे १.२९ कोटी रुपये आहे.
जप्त केलेले तेल निकृष्ट दर्जाचे, असुरक्षित किंवा चुकीचे लेबल लावलेले असल्याचा संशय आहे. या तेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून, अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

कॅम्पमधील वडापाव केंद्रातून शेंगदाणा तेल जप्त
कॅम्पमधील गवळी वाडा येथील गार्डन वडापाव सेंटरमध्ये ३५८.४ किलो फिल्टर केलेले शेंगदाणा तेल आढळले. त्याची किंमत ७१,९१८ रुपये आहे. हे तेल निकृष्ट दर्जाचे असल्याचा संशय एफडीएने व्यक्त केला. तसेच, अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियमातील कलम २३, २६ आणि २७ चे उल्लंघन झाल्याचे नमूद करण्यात आले.
गुलटेकडी मार्केट यार्ड येथील ४२३ क्रमांकाच्या प्रज ट्रेडर्समधून ३,१७६.८ किलो रिफाइंड सोयाबीन तेल आणि पामोलीन तेल जप्त करण्यात आले. त्याची किंमत सुमारे ६.३५ लाख रुपये आहे. या आस्थापनातील प्रयोगशाळा कार्यरत नसल्याचे आणि रसायनशास्त्रज्ञाची नियुक्ती नसल्याचे तपासणीत आढळल्याचे सांगण्यात आले. येथील तेलही निकृष्ट दर्जाचे असल्याचा संशय आहे.

शुक्रवार पेठेतील मंडईजवळील ६८८ क्रमांकाच्या श्री रामकृष्ण ऑइल मिल्समधून २१८.४ किलो कोल्ड प्रेस्ड शेंगदाणा तेल जप्त करण्यात आले. त्याची किंमत ८४ हजार रुपये आहे. हे तेल निकृष्ट दर्जाचे असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली.
या तीन आस्थापनांमधून एकूण ३,७५३.६ किलो तेल जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत ७,९१,३०८ रुपये आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.