Pune
ज्या पक्षाच्या बांधणीसाठी आम्ही आमची तरुणाई घालवली, घरावर तुळशीपत्र ठेवलं, छोट्या छोट्या नोकऱ्या करून पक्षासाठी काम केले, त्याच पक्षात एखादा मोठा निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा कार्यकर्त्यांची आठवण येत नाही का ? त्यांना विचारणा केली जात नाही.
प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही आणि कुणीतरी एक व्यक्ती येतो आणि कुठलाही निर्णय घेतो. पक्षात असं जर होत असेल, तर हे भाजपच्या अंतर्गत संविधानाप्रमाणे नाही. पक्षाच्या नियमाप्रमाणे पार्लमेंटरी बोर्ड बसल्यानंतर उमेदवारी घोषित झाली पाहिजे. मात्र पदवीधर मतदारसंघात ती आधी का घोषित करण्यात आली? हे प्रश्न विचारले आहे भाजपचे माजी आमदार गिरीश व्यास यांनी. गिरीश व्यास (Girish Vyas) यांनी आज अनिल सोले यांच्या बंडखोरीला पाठिंबा (Nagpur Politics) देत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला
भाजपचेमाजीआमदार गिरीश व्यास यांनीनुकताच भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय. त्यांच्या राजीनाम्यामुळे नागपूरभाजपलामोठाधक्काबसलाअसून राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना सुरुवात झाली आहे. तरव्यासयांनी भाजपचे बंडखोर उमेदवार अनिल सोले यांना पाठिंबा जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, व्यास यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आपले कार्यालय सोले यांच्या निवडणूक प्रचारासाठी उपलब्ध करून दिले आहे. या कार्यालयाचा शुभारंभ हीपारपडला असून, बडकस चौकातील हे कार्यालय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाजवळ असल्याने राजकीय वर्तुळात या घडामोडीची चर्चा सुरू झाली आहे.