आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

मुळशीतील रुग्णांना तात्काळ बेड मिळावेत; सभापती मंदाताई शेळके यांची सिम्बॉयसिस प्रशासनाला सूचना

नितीन देशपांडे   257   08-10-2026 18:21:41

लवळे | प्रतिनिधी - मुळशी तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार आणि तातडीच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच गरजू रुग्णांना उपचारासाठी तात्काळ बेड उपलब्ध करून देण्यात यावेत, यासाठी मुळशी पंचायत समितीच्या सभापती मंदाताई बाबाजी शेळके यांनी लवळे येथील सिम्बॉयसिस हॉस्पिटलला भेट देऊन हॉस्पिटल प्रशासन व संबंधित डॉक्टरांशी सविस्तर चर्चा केली.

मुळशी तालुक्यातील अनेक रुग्ण उपचारासाठी सिम्बॉयसिस हॉस्पिटलमध्ये येत असतात. अशावेळी रुग्णांना वेळेत उपचार मिळणे, आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे आणि गरजू रुग्णांना बेडसाठी विलंब होऊ नये, याबाबत सभापती मंदाताई शेळके यांनी हॉस्पिटल प्रशासनाचे लक्ष वेधले.

मुळशी तालुक्यातील नागरिकांना उपचाराच्या दर्जेदार सुविधा मिळाव्यात, रुग्णांची गैरसोय होऊ नये आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने बेड उपलब्ध करून देण्यात यावेत, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी हॉस्पिटल प्रशासनाला देण्यात आल्या.

तसेच मुळशी तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यविषयक अडचणी आणि उपचाराच्या गरजा लक्षात घेऊन हॉस्पिटल प्रशासनाने सकारात्मक सहकार्य करावे, अशी अपेक्षाही सभापती मंदाताई शेळके यांनी व्यक्त केली.

यावेळी सिम्बॉयसिस हॉस्पिटलचे संबंधित डॉक्टर व हॉस्पिटल मॅनेजमेंट, तसेच मुळशी पंचायत समितीचे सदस्य प्रवीण धनवे आणि पंचायत समिती सदस्या ऐश्वर्या ताई वाघमारे उपस्थित होत्या.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.