आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार;

नितीन देशपांडे   132   07-10-2026 10:36:26

Pune 

विधान परिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये राजकीय खलबते सुरू असतानाच, काँग्रेसचे दिग्गज नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी मोठं वक्तव्य केले आहे.

भाचीला मामाचा आशीर्वाद असणारच, पण मी महाविकास आघाडीला (MVA) शब्द दिलाय आणि मी एकदा दिलेला शब्द कधीही मागे घेत नाही,' असं सतेज पाटील म्हणाले. तसेच गोकुळची निवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या चर्चेवरही त्यांनी भाष्य केलं.

महाविकास आघाडीकडून शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर तर पदवीधर मतदारसंघातून हर्षदा देशमुख-जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीसोबतच आगामी 'गोकुळ' (Gokul Dudh Sangh) दूध संघाची निवडणूक देखील पूर्ण ताकदीने लढवून सर्व 25 जागा जिंकण्याचा ठाम विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे.

पुणे पदवीधरसाठी भाजपकडून स्मिता जाधव यांच्या उमेदवारीवरून विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सतेज पाटील म्हणाले, "मामाचे भाचीकडे लक्ष असणे हे एक घरगुती नाते आहे. परंतु, राजकीय भूमिका आणि नातेसंबंध वेगळे असतात. ग. गो. जाधव आणि प्रतापसिंह जाधव यांचे कुटुंब देशातील अत्यंत महत्त्वाचे कुटुंब आहे. माझी भाची या कुटुंबाची सून आहे. जर भाजपला आणि मुख्यमंत्र्यांना जाधव कुटुंबाबद्दल एवढेच प्रेम आहे, तर त्यांनी त्यांना थेट राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदार करायला हवे होते."

शरद लाड यांना राज्यपाल कोट्याचा शब्द देऊन स्मिता जाधव यांना या निवडणुकीत उतरवण्यामागे भाजपचा काय कट आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र, माझी भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. शरद पवार आणि महाविकास आघाडीने जो अधिकृत उमेदवार दिला आहे, त्यालाच निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करणार," असे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.

Vidhan Parishad Election : "नाराजांची समजूत काढणार"

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील नाराज नेत्यांविषयी बोलताना ते म्हणाले, "जर आमच्याकडून किंवा इतर घटक पक्षांकडून कोणी नाराज असेल अथवा अर्ज दाखल केला असेल, तर त्यांच्याशी सकारात्मक चर्चा करून अर्ज मागे घेण्यासंदर्भात विनंती केली जाईल."

महाविकास आघाडीत कोणतीही फूट पडू न देता पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवून दोन्ही जागांवर विजय मिळवण्याचा दावा सतेज पाटील यांनी केला आहे.

Gokul Election Satej Patil : "गोकुळची निवडणूक होणारच, 25 जागा जिंकणार"

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांचा सतेज पाटील यांनी खरपूस समाचार घेतला. "दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गोकुळची निवडणूक बिनविरोध होणार अशा बातम्या जाणूनबुजून पेरल्या गेल्या. दुष्काळ असताना गोकुळची निवडणूक बिनविरोध करा म्हणत असाल तर मग विधान परिषद आणि जिल्हा बँकांच्या निवडणुका का घेता?"


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.