Pune
राज ठाकरे यांनी आज पुण्यात सुरु असलेल्या एमपीएसीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलन स्थळाला भेट दिली. राज ठाकरे येणार म्हणून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साह शिगेला पोहचला होता.
राज ठाकरे येथे येऊन काय आश्वासन देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना. या ठिकाणी एमपीएससीच्या आंदोलनाची पार्श्वभूमी सांगणाऱ्या विवेकानंद पाटील यांच्या बाणेदार भाषणाने राज ठाकरेही आश्चर्यचकीत झाले. राज ठाकरे यांच्या समोरच विवेकानंद पाटील यांनी एपीएससीच्या अध्यक्षांना अखेरचा संदेश दिला. त्यामुळे एकच हशा उसळला.विवेकानंद पाटील यांनी राज ठाकरे यांच्या समोर नेमके काय केले भाषण वाचा…
राज ठाकरे यांनी पुणे येथे एमपीएससीच्या तरुणांनी केलेल्या आंदोलनाला भेट दिली. त्यावेळी राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी तरुणांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.त्यावेळी एमपीएससीच्या परिक्षा पेपर फुटी आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची पार्श्वभूमी विवेकानंद पाटील यांनी सांगितली. त्यावर राज ठाकरे म्हणाले मला माहिती आहे. त्यावर हे ठाकरे आहेत यांना सर्व माहिती असते असे विवेकानंद पाटील यांनी वक्तव्य करताच विद्यार्थ्यांकडून त्यांना जोरदार प्रतिसाद मिळाला.