आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Samiti Election: खेड पंचायत समितीच्या सभापतीपदी गौरी मुऱ्हे; उपसभापतीपदी दिलीप डूबे बिनविरोध

शरद लाटे  142   05-10-2026 15:31:55

Pune 

खेड पंचायत समितीच्या सभापतीपदी उद्धव ठाकरे शिवसेनेचे गौरी चंदन मुऱ्हे आणि उपसभापतीपदी दिलीप राजाराम डूबे यांची बिनविरोध निवड झाली. आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवडी नंतर समर्थकांनी पंचायत समिती आवारात फटाके फोडून तसेच भंडाऱ्याची उधळण करीत जल्लोष साजरा केला.फेटे बांधुन आणि पारंपरिक वाजंत्री लावुन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

मावळते सभापती विद्याताई मोहिते आणि उपसभापती मंगेश सावंत यांनी २१ सप्टेंबर रोजी राजीनामा दिला होता. त्यानंतर शिवसेना सदस्य राजकीय सहलीला गेले होते. नवीन पदाधिकारी निवडी साठी प्रांताधिकारी अनिल दौंडे यांनी सोमवारी (दि ५) सदस्यांची विशेष बैठक आयोजित केली होती.

त्यात शिवसेनेकडून सभापती पदासाठी कु. गौरी मु-हे आणि उपसभापती पदासाठी दिलीप डूबे यांचे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून श्रद्धा मांडेकर, दिनेश हांडे यांचे अर्ज दाखल झाले होते. निर्धारित वेळेत मांडेकर आणि हांडे यांनी माघार घेतली.त्यानंतर प्रांताधिकारी अनिल दौंडे यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली. सभागृहात शिवसेनेचे ९ असे बहुमत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ आणि शिंदे शिवसेनेचे १ असे बलाबल आहे.

मावळते सभापती विद्याताई मोहिते, उपसभापती मंगेश सावंत यांच्या सह सर्व सदस्य बैठकीला उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे गटनेते ॲड विजयसिंह शिंदे पाटील, सदस्या दीप्ती भोगाडे, तनुजा घनवट, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका ज्योती आरगडे, बाजार समितीचे सभापती अशोक राक्षे, उपसभापती रणजीत गाडे, मारुती सातकर, विजयाताई शिंदे आदी मान्यवर आणि तालुक्यातील कार्यकर्ते, नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.