आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Vidhan Parishad: भाजपने गावडेंना तिकीट देताच रोंगे नाराज, बंडाचं निशाण फडकावलं,

शरद लाटे  139   05-10-2026 15:24:03

Pune 

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर पंढरपूर येथील डॉ. बी. पी. रोंगे यांनी बंडाचे निशाण फडकावले. बी पी रोंगे यांच्या बंडखोरीमुळे पुणे शिक्षक मतदार संघात भाजपला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान बी.पी. रोंगे आज सकाळी विठ्ठलाचे दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुण्याला रवाना झाले. रोंगे मागील काही वर्षांपासून शिक्षक मतद र् संघात तयारी करत आहेत. भाजपची उमेदवारी मिळेल अशी त्यांना आशा होती,ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने रोंगे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

लढायचं आणि जिंकायचं, रोंगेंचा निर्धार


रोंगे यांच्या समर्थकांनी संत नामदेव पायरी येथे घोषणाबाजी केली. शिक्षकांचे प्रश्न सोडल्यामुळे शिक्षकांचा पाठिंबा आहे. कदाचित माझं काम पक्षापर्यंत पोचवण्यासाठी कमी पडलो असेल, त्यामुळे पक्षाने मला नाकरले असे म्हणता येणार नाही. आज उमेदवारी अर्ज भरणार आहे. आता लढायचे आणि जिंकायचे सुध्दा असा निर्धारही डॉ. बी. पी रोंगे यांनी केला आहे. रोंगे यांच्या बंडखोरीमुळे पुणे शिक्षक मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे.

भाजपकडून पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना अधिकृत उमेदवारी


भारतीय जनता पक्षाने आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. कौस्तुभ मुरलीधर गावडे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांचे ते नातू आहेत. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील मतदार आहेत.

नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने सुधाकर कोहळे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षात मोठी बंडखोरी उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मतदारसंघातून उमेदवारीसाठी उत्सुक असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार अनिल सोले कमालीचे नाराज झाले असून, आज सोमवारी दुपारी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.