आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

वाल्मीक कराडचा चेला त्याच्यापेक्षा खुंखार, सुग्रीव कराडचा जुना VIDEO व्हायरल

शरद लाटे  344   03-10-2026 14:52:39

Pune 

खासदार बजरंग सोनवणे यांनी अलीकडेच पत्रकार परिषद घेत वाल्मीक कराडवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेत एक ऑडिओ क्लिप ऐकवली. ज्यात कथितपणे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड आणि सुग्रीव कराड यांच्यात संवाद झाला होता.

वाल्मीक कराड तुरुंगातून बाहेर कट रचतो, त्याने विलास घुले हत्या प्रकरणात आपल्याला आणि आपल्या मुलाला अडकवण्याचा कट रचला, असा आरोप सोनवणे यांनी केला होता.

आता वाल्मीक कराडसोबत ज्या सुग्रीव कराडशी संवाद झाल्याचा दावा केला होता. त्याच सुग्रीव कराडचा आता एक जुना झाला आहे. यामध्ये सुग्रीव कराड हा बीड ते केज रोडवर असलेल्या मस्साजोग जवळील टोल नाक्यावर या ठिकाणच्या कामगारांशी वाद घालत असल्याचे दिसते.. तसेच एका तासात माणसासकट सगळंच जाळून टाकेन, अशी धमकी देखील दिल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे.

बीडच्या उमरी टोल नाक्यावर पुन्हा एकदा कराड कनेक्शन चर्चेत आलंय. वाल्मीक कराडचा साथीदार म्हणून उल्लेख होणाऱ्या सुग्रीव कराडने मस्साजोगच्या एका देशमुख नामक तरुणाला धमकी दिल्याचा आणि हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. टोल न भरण्यावरून वाद झाल्यानंतर सुग्रीव कराडने संबंधित तरुणाला माणसासकट एका तासात सगळं जाळून टाकण्याची धमकी दिली.या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून, हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीचा असल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे, याच उमरी टोल नाक्याचा संबंध संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी जोडला जातो. संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर याच परिसरातून त्यांना नेण्यात आल्याचं तपासात समोर आलं होता. आता त्याच टोल नाक्यावर मस्साजोगच्या एका तरुणासोबत सुग्रीव कराडचा वाद झाला. बजरंग सोनवणे आरोप केलेला वाल्मीक कराड सोबत संवाद साधणाऱ्या सुग्रीव कराडचा दहशत आणि गुंडगिरीचा हा प्रकार समोर आल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.