आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Maharashtra Cabinet : मुख्यमंत्री फडणवीस यांची सगळ्यात मोठी घोषणा, कॅबिनेट बैठकीत १० मोठे निर्णय

नितीन देशपांडे   268   29-09-2026 17:16:24

Pune 

महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत दहा टक्के समांतर आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गट-क मधील गणवेशधारी सेवांच्या पदांवर त्यांना नियुक्ती मिळणार आहे.

सैन्य दलातून चार वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झालेल्या अग्निविरांना सेवेत दाखल करून घेण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत सामान्य प्रशासन, पशुसंवर्धन, गृह, महसूल, विधी आणि न्याय विभागातर्फे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे.

कॅबिनेट बैठकीत १० मोठे निर्णय


महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत दहा टक्के समांतर आरक्षण. गट - क मधील गणवेशधारी सेवांच्या पदांवर नियुक्ती मिळणार. सैन्य दलातून चार वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झालेल्या अग्निविरांना सेवेत दाखल करून घेण्याचे धोरण निश्चित (सामान्य प्रशासन)

महाराष्ट्र वैरण विकास धोरण जाहीर. राज्यातील पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता निश्चित होणार. जिल्हानिहाय चारा उत्पादन, लागवडीयोग्य गवतांची यादी, वैरण उपयुक्त वृक्षांची यादी, सुधारित चारा पिके, पारंपरिक व अपारंपरिक चारा स्त्रोत यांचा साकल्याने विचार. विविध शासकीय वैरण विकास योजनांचे नियोजन. दुग्धव्यवसाय आणि पशुपालन या शेतीपूरक व्यवसायास चालना मिळणार. (पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग)



न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचा २ हजार ७६१ पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर. (गृह विभाग)

'महाराष्ट्र कारागृहे सुधारसेवा अधिनियम, २०२५ मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी. (गृह विभाग)

नागपूर जिल्ह्यातील मौ. बेला (ता. उमरेड) येथील २ हेक्टर ३७ आर शासकीय जमीन नागपूर- म्हाडास देण्यास मंजुरी. म्हाडा याठिकाणी गरजू व गरिबांसाठी परवडणारी घरे (Smart Village) प्रकल्प साकारणार. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क)

सूर्या प्रकल्पग्रस्तांना ५६ वर्षानंतर न्याय. पालघरच्या नेवाळे, हनुमाननगरमधील जमिनींच्या फेरवाटपास मान्यता. प्रकल्पग्रस्तांची नावे सातबारावर नोंदण्यास मान्यता. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क)

मुंबईतील वांद्रे (ता.अंधेरी) येथील भुखंडाच्या भाडेपट्ट्याच्या नुतनीकरणास मंजुरी. नॅशनल सोसायटीज फॉर क्लीन सिटीज सामाजिक संस्थेस दिलेल्या ६ हजार ११० चौ. मी. जमिनीच्या भाडेपट्ट्याच्या नुतनीकरणास मंजुरी. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क)


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.