आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

पदवीधरला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून हर्षदा जाधव-देशमुख मैदानात?

नितीन देशपांडे   34   24-09-2026 11:17:15

Pune 

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. महायुतीमध्ये ही जागा कोण लढणार याबाबत एकमत दिसून येत नाही. भाजपने आपला दावा कायम ठेवला आहे. तर, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नेते देखील तयारीला लागले आहेत.

त्यामुळे महायुतीमध्ये फूट असल्याचे चित्र असताना महाविकास आघाडीमध्ये मात्र एकी दिसून येत आहे.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतील जागा वाटपांचे प्राथमिक सूत्र निश्चित झाले आहे. त्यानुसार पदवीधरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला, तर शिक्षक मतदारसंघाची जागा पुन्हा काँग्रेसला देण्याचे ठरल्याची माहिती आहे.

सहा वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत पदवीधरमधून त्यावेळच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड विजयी झाले होते, तर शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे प्रा.जयंत आसगावकर विजयी झाले होते.

सहा वर्षांपूर्वीचा फाॅर्म्युला कायम ठेवत महाविकास आघाडीत ज्या जागा ज्या पक्षाने जिंकल्या होत्या. त्या त्याच पक्षाकडे कायम ठेवण्याचा निर्णय राज्यपातळीवर महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्राथमिक बैठकीत ठरले आहे.

पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडेच राहण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडून माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या कन्या हर्षदा जाधव-देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सध्या देशमुख हे रयत शिक्षण संस्थेवर कार्यरत आहेत.

रयत'चे राज्यभर पसरलेल्या शिक्षण संस्थांचे जाळे हे या उमेदवारी देण्यामागचे मुख्य कारण समजले जाते. आणि रयतचे शिक्षक मतदारसंघावर अनेक वर्षांपासून काँग्रेसचे वर्चस्व आहे. गेल्या निवडणुकीतही ही जागा काँग्रेसने जिंकली होती, त्या जोरावर पुन्हा ही जागा काँग्रेसच्याच वाट्याला येणार आहे.

काँग्रेसकडून आसगावकरच पुन्हा

काँग्रेसकडून शिक्षक मतदारसंघात विद्यामान आमदार प्रा. जयंत आसगावकर यांची उमेदवारी निश्चित समजली जाते. उमेदवारी अर्ज 29 सप्टेंबरपूर्वी दाखल करायचा आहे. त्यामुळे त्याआधी मविआच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होऊन उमेदवार निश्चित केली जाईल. त्यामुळे पदवीधर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर शिक्षकची जागा काँग्रेसकडेच राहील हे सुत्र कायम राहणार असल्याचे चित्र आहे.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.