आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

छातीत दु:खू लागलं, रुग्णालयात दाखल केलं; शिंदेंच्या एस्कॉर्टमधील PSI चं निधन

शरद लाटे  54   21-09-2026 16:44:20

Pune 

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील पोलीस उपनिरीक्षक विजय सांगडे (police) यांचे कर्तव्यावर असतानाच निधन झाले, त्यांचे वय 57 वर्षे होतं. ठाणे (Thane) येथे आज सकाळी ते ड्युटीवर कामावर आल्यानंतर ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात त्यांना छातीत दुखलं आणि चक्कर आली.

त्यांनतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, विजय सांगडे यांच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

पोलीस उपनिरीक्षक विजय सांगडे यांना अचानकपणे छातीत दुखू लागले होते. त्यानंतर, उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकात ते कार्यरत होते, गेल्या तीन वर्षांपासून ते एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्टमध्ये कार्यरत होते. तर, डोंबिवलीच्या पलावा सिटीमध्ये आपल्या कुटुंबसोबत राहत होते. त्यांच्या निधनानंतर पोलिसांकडून त्यांना बंदुकीच्या तोफेतून अखेरची सलामी देण्यात आली. आता, त्यांच पार्थिव सांगडे यांच्या मूळ गावी नेण्यात येणार आहे.

दिवंगत पोलीस उपनिरीक्षक विजय सागंडे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. ठाण्यातील सिव्हिल रुग्णालय परिसरात ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून मानवंदना आणि श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पोलीस उपायुक्त परिमंडळ -१ बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ -५ प्रशांत कदम सह इतर वरिष्ठ पोलीस उपस्थित होते.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.