आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Amruta Fadanvis : ते माझे भाऊ; अमृता फडणवीसांचं जरांगें पाटलांना जेवणाचं निमंत्रण

Amruta Fadanvis : ते माझे भाऊ; अमृता फडणवीसांचं जरांगें पाटलांना जेवणाचं निमंत्रण  456   09-09-2026 22:21:21

Pune 

राज्यामध्ये मराठा आरक्षण प्रश्नावरुन मोठा गदारोळ सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 12 दिवसांपासून अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे.

कुणबी प्रमाणपत्र मिळण्यामध्ये मराठा समाजाला अडचणी येत असल्याचं म्हणत जरांगे उपोषणावर ठाम आहेत. त्यांनी सरकारच्या शिष्टमंडळांशी चर्चा केली पण जोपर्यंत कायमचा तोडगा निघत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही, असा पवित्रा जरांगेंनी घेतला आहे. यावेळी त्यांनी अनेकदा फडणवीस सरकारवर टीका केलेली पाहायला मिळाली पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जरांगे पाटील यांना जेवणाचं निमंत्रण दिलं आहे. त्या म्हणाल्या की “मनोज जरांगे पाटील हे माझे भाऊ आहेत आणि मी त्यांना घरी जेवायला यायचं निमंत्रण देते.” त्या नागपूरमध्ये बोलत होत्या.

दुसरीकडे जरांगे उपोषणावर ठाम असून सरकारकडून कायमस्वरूपी तोडगा निघेपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे अमृता फडणवीसांच्या या निमंत्रणावर जरांगे काय प्रतिक्रिया देतात, याकडे लक्ष लागलं आहे. सध्या जरांगेंचं उपोषण 12 व्या दिवशीही सुरूच आहे.

यावेळी सातत्याने होणाऱ्या ट्रोलिंगवर म्हणाल्या की, “मंत्र्याची बायको सगळ्यात जास्त ट्रोल होते. त्याची उपाधी मला दिली गेली आहे. आपल्या धर्मात वेगवेगळे रंग आहे. जगात सगळ्यात जास्त ख्रिश्चन धर्माला मानलं जातं. ते लोक सर्व धर्माच्या लोकांचा समावेश आपल्या उत्सवात करतात. नवीन वर्षाचे ख्रिसमस असो त्यांनी लोकांना सेलिब्रेट करायला लावले. त्याच पध्दतीने हिंदू धर्मात व्हावे. आपले सुद्धा दहीहंडी नवरात्र गरबा हे चांगले सण आहे. कोणी श्रद्धेने कोणत्याही जातीचा श्रद्धेने त्या ठिकाणी येत असेल आणि अडचणी निर्माण करत नसेल. कुटुंबासोबत विश्वासाचा टिळा लावून येत, असेल तर त्याला येऊ द्यावं.”


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.