आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांना प्रारूप यादीमधून वगळले

शिंदे राम   108   01-09-2026 07:19:22

Pune 

महाराष्ट्रात तीन महिन्यांपासून विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) सुरू होते. महाराष्ट्र आणि दिल्लीतील विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) अंतर्गत पहिली प्रारुप यादी आज (31 ऑगस्ट) जाहीर करण्यात आली.

मतदार यादीत महाराष्ट्रातील एकूण मतदारांपैकी 2 कोटी 7 लाख मतदारांची नावे नाहीत. या मतदारांनी फॉर्म जमा केलेला नाही त्यामुळे त्यांचा रेकॉर्ड डिजिटाईज केलेला नाही. तसेच दिल्लीमधील 1 कोटी 45 लाख नोंदणी झालेल्या मतदारांपैकी 47 लाख 56 हजार 722 मतदारांची नावे प्रारूप यादीतून वगळण्यात आलेली आहेत. सुमारे 97 लाख 53 हजार 507 मतदारांची माहिती डिजिटलमध्ये घेण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रत्येकाने आपापले नाव प्रारूप यादीत शोधायचे आहे. विशेष म्हणजे प्रारूप यादीत नाव नसले तरी घाबरून जाण्याची गरज नाही. कारण यंदा 30 सप्टेंबरपर्यंत फॉर्म 6 भरून मतदार यादीत तुमच्या नावाचा समावेश करू शकता. मतदारांची अंतिम यादी यंदा 4 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रासह दिल्लीतील SIR अंतर्गत प्रारूप मतदार यादी सोमवारी (31 ऑगस्ट) प्रसिद्ध करण्यात आली. घरोघरी जाऊन केलेली पडताळणी आणि डिजिटायजेशनसाठीचा फॉर्म जमा न होणे तसेच इतर काही तांत्रिक बाबींमुळे मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात प्रारुप यादीत आलेली नाहीत. स्थलांतर, मृत, गैरहजर, दुबार नावे, विदेशी आणि इतर श्रेणीतील मतदारांची नावे या यादीतून वगळण्यात आली आहेत.

तुमचं नाव शोधण्याची पद्धत

प्रारूप मतदार यादी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या ceo.maharashtra.gov.in आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या voters.eci.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध करण्यात आली आहे. तुमच्या क्षेत्रातील BLO यांच्याकडेही ही यादी पाहता येईल. तुमचे नाव पाहताना नावाची स्पेलिंग, वय, जन्मतारीख, पत्ता तसेच EPIC क्रमांक बरोबर असल्याची खात्री करून घ्या.

तीन अर्जांचे महत्त्व

  • प्रारूप मतदार यादीत तुमचे नाव नसेल तर 30 सप्टेंबरपर्यंत फॉर्म 6 भरून द्यायचा आहे.
  • हरकत दाखल करण्यासाठी फॉर्म 7 चा वापर करायचा आहे.
  • नावातील दुरुस्ती, पत्ता बदलण्यासाठी, स्पेलिंगमधील दुरुस्तीसाठी फॉर्म 8 चा भरून द्यायचा आहे.

वरील तिन्ही अर्जांवर रितसर सुनावणी घेऊन 29 ऑक्टोबरपर्यंत मतदारांच्या तक्रारींचे निवारण केले जाईल. त्यानंतर 4 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.