आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

WOW’ संघटनेतर्फे बेघर निवारा केंद्रात रक्षाबंधन उत्साहात साजरे

नितीन देशपांडे   380   28-08-2026 21:30:47

सोलापूर : ‘WOW’ संघटनेच्यावतीने कुमठा नाका येथील ‘आपुलकी बेघर निवारा केंद्रा’मध्ये रक्षाबंधनाचा पवित्र सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी केंद्रातील गोरगरीब, वंचित व निराधार बांधवांना प्रेम, आपुलकी आणि सन्मानाची भावना जपत राख्या बांधण्यात आल्या तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने मिळालेल्या या आपुलकीच्या7 स्नेहामुळे निवारा केंद्रातील बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. समाजातील वंचित घटकांसोबत सण साजरे करून त्यांच्यामध्ये आपलेपणाची भावना निर्माण करण्याचा सामाजिक उपक्रम WOW’ संघटनेतर्फे राबविण्यात आला.

या कार्यक्रमास संघटनेच्या पदाधिकारी सौ. विद्या लोलगे, सौ. पुष्पा हलकुडे, सौ. मार्था आसादे, सौ. शारदा मसूती, सौ. शोभा गायकवाड आणि सौ. स्वाती मुकणार उपस्थित होत्या.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ‘आपुलकी बेघर निवारा केंद्रा’चे व्यवस्थापक श्री. अशोक वाघमारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. वंचित बांधवांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केल्याबद्दल त्यांनी WOW’ संघटनेचे आभार व्यक्त केले.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.