आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

खडकवासला-हडपसर-खराडी मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती; सर्व्हे आणि आराखड्याचे काम सुरू

नितीन देशपांडे   393   26-08-2026 18:57:34

Pune News खडकवासला-हडपसर-खराडी मेट्रो प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रकल्पाच्या सर्व्हेक्षणासह आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, प्रत्यक्ष काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने पुणे मेट्रोकडून प्रयत्न सुरू आहेत.

मेट्रो अधिकाऱ्यांनी बैठकीत याबाबत माहिती दिली.

प्रस्तावित मेट्रो मार्गामुळे खडकवासला परिसराचा हडपसर आणि खराडी या महत्त्वाच्या भागांशी थेट संपर्क निर्माण होणार आहे. त्यामुळे शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होण्यासोबतच नागरिकांना वेगवान आणि सुविधाजनक सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

केंद्र सरकारने पुणे मेट्रो फेज-2 अंतर्गत या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. खडकवासला-हडपसर-खराडी कॉरिडॉर सुमारे 25.5 किलोमीटर लांबीचा असून, या मार्गावर 22 उन्नत स्थानके प्रस्तावित आहेत.

या प्रकल्पाच्या कामासाठी अधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसापूर्वीच पुणे महापालिकेच्या नगरसेविका धनश्रीताई कोल्हे व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव ओबीसी मोर्चा दत्ताभाऊ कोल्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयात बैठक घेतली होती.

प्रकल्पाच्या अंमलबजावणीपूर्वी प्रस्तावित मार्ग, स्थानकांची ठिकाणे तसेच संबंधित पायाभूत सुविधांची पाहणी केली जात आहे. या सर्वेक्षणाच्या आधारे आवश्यक नियोजन आणि आराखडा निश्चित करण्यात येणार असून, त्यामुळे प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला गती मिळण्याची शक्यता आहे.

खडकवासला परिसरातील नागरिकांच्या मागण्या, स्थानकांची आवश्यकता आणि प्रकल्पाशी संबंधित पायाभूत सुविधांचा विचार करून पुढील नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे या मेट्रो प्रकल्पाकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले असून, प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला लवकर सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.