आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

पुणे पोलिसांचा देशपातळीवर डंका! 🚨 आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह ९ पोलिसांना ‘अति-उत्कृष्ट’ सेवा पदक

नितीन देशपांडे   158   14-08-2026 21:30:48

Pune 

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालयतर्फे पोलीस दलातील दीर्घकालीन, निष्कलंक, उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवेची दखल घेऊन दिला जाणारा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

यामध्ये पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह पुणे शहरातील एकूण २४ पोलीस अधिकारी व अंमलदारांना 'अति-उत्कृष्ट सेवा पदक' आणि 'उत्कृष्ट सेवा पदक' जाहीर करण्यात आले आहे.

अति-उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झालेले अधिकारी व अंमलदार (९):
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बन्सोडे, सहाय्यक पोलीस फौजदार दिलीप दिगंबर ज्ञानपुरे, नितीन तुळशीराम जगताप, राजस हुसेन शेख, राजेंद्र आत्माराम पालांडे, सत्यवान बबन साबळे आणि संतोष भगवान कुचेकर यांना हे पदक जाहीर झाले आहे.

उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झालेले अधिकारी व अंमलदार (१५):
सह पोलीस आयुक्त संजय डराडे, पोलीस निरीक्षक कैलास भिकू डाबेराव, स्वप्नाली चंद्रकांत शिंदे, उमेश अंबादास गिते, पोलीस उपनिरीक्षक अमित अधिकराव सिदपाटील, पोलीस हवालदार सुधीर अंकुश इंगळे, योगराज हरिश्चंद्र घाटगे, पोलीस शिपाई हनुमंत विलास थोपटे, पोलीस हवालदार मच्छिंद्र कांतीलाल भंडारे, सचिन सुभाष अहिवळे, राहुल रामचंद्र माने, संदीप राम पाटील, शैलेश शरद सुर्वे, सत्यवान ज्ञानोबा ठोंबरे आणि महिला पोलीस हवालदार धनश्री विजय कामठे यांचा यात समावेश आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.