आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

वाढदिवसाचा खर्च टाळून मोशी दुर्घटनेतील पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात; नगरसेवक निखिल बोऱ्हाडे सोशल फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम

नितीन देशपांडे   99   05-08-2026 23:10:43

मोशी दुर्घटनेतील पीडित कुटुंबीयांना प्रत्येकी ₹50 हजारांची आर्थिक मदत

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | 06 ऑगस्ट 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या अनधिकृत प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळून नऊ कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या हृदयद्रावक घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण मोशी परिसरात शोककळा पसरली होती.

या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक तथा प्रभाग अध्यक्ष निखिल बोऱ्हाडे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेत सामाजिक बांधिलकी जपली. वाढदिवसावरील खर्च टाळून निखिल बोऱ्हाडे सोशल फाउंडेशनच्या वतीने मोशी दुर्घटनेतील पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात देण्यात आला.

मोशी परिसरातील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कै. वामन दगडू कसबे, कै. सनी अशोक माने, कै. अक्षय राजू सावंत, कै. राहुल धोंडीबा गायकवाड आणि कै. नागेश सर्जेराव गायकवाड यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ₹50,000 इतकी आर्थिक मदत धनादेशाद्वारे प्रदान करण्यात आली.

विशेष म्हणजे, नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांनी स्वतः पीडित कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली, त्यांचे सांत्वन केले आणि धनादेश सुपूर्द करत त्यांच्या दुःखात सहभागी होत सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श निर्माण केला.

या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत असून, संकटाच्या काळात पीडित कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा हा प्रयत्न समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.