पौड-अंबडबेट जिल्हा परिषद गटातील विकासकामांसाठी जिल्हा परिषद सदस्य मिलिंद वाळंज यांची ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे मागणी
मुळशी प्रतिनिधी -: मुळशी तालुक्यातील पौड-अंबडबेट जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामांसाठी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य मिलिंद वाळंज यांची आज राज्याचे ग्रामविकास मंत्री विजयकुमार गोरे यांची भेट घेऊन
पौड-अंबडबेट जिल्हा परिषद गटातील विविध प्रलंबित विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी ग्रामविकास विभागामार्फत विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळावी, आवश्यक निधी उपलब्ध करून ही कामे तातडीने मार्गी लावावीत, अशी मागणी करण्यात आली. भोर-राजगड-मुळशी मतदारसंघाचे आमदार मा. शंकरभाऊ मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघातील विकासकामांना गती देऊन नागरिकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी भूमिका मिलिंददादा वाळंज यांनी मांडली.
यावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित मागण्यांवर लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
तसेच ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून आवश्यक मंजुरी व निधी उपलब्ध करून जिल्हा परिषदेमार्फत ही विकासकामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीमुळे पौड-अंबडबेट जिल्हा परिषद गटातील रस्ते, पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा आणि इतर विकासकामांना गती मिळणार असून नागरिकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास श्री. मिलिंद वाळुंज यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मिलिंददादा वाळंज म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री सुमित्रावहिनी पवार व आमदार शंकर भाऊ मांडेकर यांच्या दूरदृष्टी खाली तालुक्यातील विकास चांगल्या पद्धतीने सुरू आहे मात्र ग्रामविकास खात्याच्या मार्फत नवनवीन योजना किंवा अधिकच्या निधीसाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री विजयकुमार गोरे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले यावेळी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच या समस्या सोडवल्या जातील असे आश्वासन दिले याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त.