आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

केंद्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, थेट सर्वसामान्यांना दणका, कांदे खरेदीवर तब्बल

शरद लाटे  346   05-07-2026 10:59:16

पुणे प्रतिनिधी - 

केंद्र सरकारने कांद्याबाबत अत्यंत मोठा निर्णय घेतला. ज्यामुळे त्याचा थेट परिणाम कांद्याच्या भावावर होणार आहे. कांद्याचा वापर दररोजच्या जेवणात होतो. याच कांद्याकरिता आता लोकांना अधिकचे पैसे मोजावी लागणार आहेत.

शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा आणि गरजेच्या वेळी बाजारात कांद्याची उपलब्धता कायम राहावी, याकरिता केंद्र सरकारने थेट बफर स्टॉकसाठी खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचा खरेदी दर वाढवला आहे, याबाबत थेट निर्णय घेण्यात आला. ज्यामुळे आता कांद्याच्या भावात थेट मोठी वाढ होईल. 13 टक्क्यांनी खरेदी वाढली आहे. बफर स्टॉकसाठी कांद्याची खरेदी शेतकऱ्यांकडून 2,125 रुपये दराने केली जाईल. हा नवीन दर कालपासूनच लागू करण्यात आला. सरकारी संस्थांना फक्त 2000 टन कांद्याची खरेदी करता आली आहे. चालू हंगामात बफर स्टॉकसाठीच्या कांद्याच्या खरेदी दरात सरकारने वाढ करण्याची ही पाचवी वेळ आहे. ज्यामुळे याचा थेट परिणाम लोकांच्या महिन्याच्या बजेटवर होणार आहे.

केंद्र सरकारचा हा अत्यंत मोठा निर्णय म्हणावा लागेल. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा मुख्य उद्देश असा आहे की, शेतकऱ्यांना कांद्याचा चांगला भाव मिळावा. मात्र, हा सर्वसामान्य लोकांकरिता नक्की दणका आहे. 2026-26 मध्ये देशातील कांद्याचे उत्पादन 307.37 लाख होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षीही इतकेच उत्पादन झाले होते.

कोणताही प्रकारचा देशात कांद्याचा तुटवडा नसल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. महाराष्ट्रातून 30,000 टनांहून अधिक कांदा येत आहे. घाऊक बाजारात याचा सरासरी दर प्रति किलो सुमारे 18 रुपये आहे. किरकोळ बाजारात दर प्रति किलो सुमारे 31 रुपये आहे. सरकारच्या अंदाजानुसार, देशात यावेळी उत्पादन 307.37 लाख टन होऊ शकते. तसा अंदाज आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.