आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या वाटेवर, पत्रकार परिषदेत मोठी घोषणा,

शरद लाटे  252   03-07-2026 14:50:39

Shivsena pune 

राजकारणात मोठे धक्के सहन करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा हिंदुत्वाच्या वाटेवर परतण्याचे संकेत दिले आहेत.

राम मंदिराच्या दान पेटीत झालेल्या चोरीच्या मुद्यावर त्यांनी मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. “राम मंदिराचा पैसा पक्ष फोडण्यासाठी वापरला जात आहे. अब हिंदू मार नही खायेगा असं वाजपेयी म्हणाले होते. आता मी म्हणीन हिंदू माफ नही करेगा. त्याची सुरुवात आम्ही येत्या रविवारपासून करणार आहोत. दादरमध्ये मारुतीच मंदिर आहे तिथे चारच्या सुमारास जमणार आहोत. राम रक्षा आंदोलन सुरु करणार आहोत” अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

भाजपच्या सत्तेचं मूळ राम मंदिर आहे. राम मंदिरासाठी जे आंदोलन झालं होतं. त्यात अनेक शिवसैनिक सहभागी होते. तो काळ आजही आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल. ती दृश्य जनतेच्या मनात रुजलेली आहेत. राम मंदिराच्या मुद्याला भाजपने हात घातला. आज अमर्यादा सत्ता उपभोगत आहेत. आज आमदार, खासदार फोडले जात आहेत. याला ऑपरेशन नाव दिलं जातं. मग आता भाजपं ऑपरेशन राम मंदिर करतय का? राम मंदिरावर दरोडा टाकला गेला आहे” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

भाजपच्या सत्तेचं मूळ हे राम मंदिर

“आपल्या देशात राज्यात शहरात राजकारणात नागरिकांच्या जीवनात अनेक व्यथा समस्या भेडसावत आहेत. तुमच्या मनात प्रश्न आहे. माझ्याही मनात प्रश्नांबद्दल प्रश्न आहेत. आज मी एकाच विषयावर बोलणार आहे. संपूर्ण देशात गोंधळ उडाला आहे. कोणी कुणाचं उत्तरादायित्व घेत नाही. मुळावर आघात करण्याची वेळ आली आहे. भाजपच्या अंमला खाली देश आहे. भाजपच्या सत्तेचं मूळ हे राम मंदिर आहे. त्यात आम्ही आहोत” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

त्यात हिंदुंनी बरंच काही सोसलं होतं

“राम मंदिरासाठी जे आंदोलन झालं. त्यात शिवसैनिक देशातील हिंदू सहभागी होता. तुमच्या माध्यमातून त्या काळातील दृश्य जनतेच्या मनात खोलवर रुजली आहे. गोध्रा, अहमदाबादमधील दंगल, मुंबईतील बॉम्बस्फोट. त्यात हिंदुंनी बरंच काही सोसलं होतं. त्याचं भांडवलं भाजपने केलं. राम मंदिर आंदोलन सुरू करण्यापूर्वी त्यांचे दोन खासदार होते. गांधी वादी, समाजवाद त्यांचा होता. ते सोडून ते राम मंदिराच्या मुद्द्याला हात घातला. आज देशात अमर्याद सत्ता भोगत आहे” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.