आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

विलास घुले प्रकरणात गंभीर आरोप, थेट आमदार सुरेश धस यांना जब्या म्हणत

शरद लाटे  79   03-07-2026 11:46:17

Pune News 

नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील आणि आमदार सुरेश धस यांच्यावर जोरदार टीका केली. यादरम्यान बोलताना त्यांची जिभ घसरली. मनोज जरांगे पाटील यांचा मन्या म्हणून एकेरी उल्लेख तर सुरेश धस यांचाही आष्टीचा जब्या उल्लेख केला.

विलास घुले हत्या प्रकरण रफादफा करण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोपही यादरम्यान नवनाथ वाघमारे यांनी केला. विलास घुले प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव आल्याने मोठी खळबळ उडाली. काही गंभीर आरोपही केली. एसआयटीकडून खासदार पुत्राची चाैकशी देखील करण्यात आली. विलास घुले प्रकरणात मनोज जरांगे यांनी मोठे विधान केले. यादरम्यानच या मुद्द्यात नवनाथ वाघमारे यांनी सुरेश धस, विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके यांच्यासह बजरंग सोनवणेंवर हल्लाबोल चढवला.

बीड जिल्ह्यातील विलास घुले हत्या प्रकरण राज्यभरात गाजत आहे. या प्रकरणावरून ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि आमदार सुरेश धस यांच्यावर चांगलाच हल्लाबोल करत जहरी टीका केली. आंतरवालीचा मन्या असं म्हणत जरांगे पाटील यांचा एकेरी उल्लेख केला तर आष्टीचा जब्या असं सुरेश धस यांना म्हणत टीका केली.

विलास घुले हत्या प्रकरण रफादफा करण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते प्रयत्न करत असल्याचा आरोप करत खासदार बजरंग सोनवणे प्रकाश सोळंके सुरेश धस आणि विजयसिंह पंडित यांच्यावर जोरदार निशाणा साधला. शिवाय एसआयटीमध्ये काहीच सापडलं नाही हे जरांगे यांना कसं काय माहित असाही सवाल नवनाथ वाघमारे यांनी उपस्थित केला.

दरम्यान येत्या दोन ते तीन दिवसात आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सर्व काही सांगणार असल्यासही वाघमारे यांनी म्हटलं. विलास घुले हत्या प्रकरणानंतर ओबीसी समाज आक्रमक होताना दिसत आहे. दुसरीकडे बीड जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी देखील बाजू मांडताना दिसत आहेत. ओबीसी नेत्यांकडून विलास घुलेला न्याय मिळून देण्याकरिता प्रयत्न केली जात आहेत


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.