आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Modi cabinet reshuffle : एकाचवेळी 12 केंद्रीय मंत्र्यांना सोडावे लागले पद, 43 जणांना शपथ; मोदी सरकार

Swati Jain   43   03-07-2026 11:12:29

Pune News 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळातील पहिला फेरबदल लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या फेरबदलामध्ये काही बड्या मंत्र्यांना पदावर पाणी सोडावे लागू शकते.

शपथ देण्यात आली होती.

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार ७ जुलै २०२१ रोजी झाला होता. या विस्तारामध्ये महाराष्ट्रातील चौघांची वर्णी लागली होती. आता तिसऱ्या कार्यकाळातील विस्तारामध्येही महाराष्ट्राला आणि प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला झुकते माप दिले जाण्याची दाट शक्यता आहे. शिंदे यांच्या पक्षात नुकतेच उद्धव ठाकरेंच्या सहा खासदारांनी प्रवेश केला आहे.

मोदी ३.० फेरबदल

मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या फेरबदलामध्येही मोठी नावे समोर येऊ शकतात. प्रामुख्याने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांना डच्चू दिला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. या विस्तारावरही उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे सावट असणार आहे. राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज करण्याच्या अनुषंगाने मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. त्याचप्रमाणे, पंजाब, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार या राज्यांमधील मोठे चेहरेही मंत्रिमंडळात दिसू शकतात.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.