जिल्हा परिषद सदस्य शिवाजी बुचडे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश;
मुळशी प्रतिनिधी -: मुळशी तालुक्यातील केमसेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पाचवीचा वर्ग सुरू करण्यासाठी माण हिंजवडी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपाचे गटनेते शिवाजी बुचडे पाटील यांनी पुढाकार घेतला होता.
यसंदर्भात त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली होती विवेक वळसे पाटील व गजानन पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच याबाबत निर्णय घेऊ असा सकारात्मक प्रतिसाद त्यांना दिला होता, अखेर त्यांच्या मागणीला आज मोठी यश आले आहे केमसेवाडीत 5 चा वर्ग सुरू झालेला आहे,
सध्या केमसेवाडी येथे जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. मात्र पाचवीच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना इतर गावांमध्ये जावे लागत असल्याने पालकांवर आर्थिक व मानसिक ताण येत असून, लहान विद्यार्थ्यांनाही रोजचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती हीच बाब प्रशासनाच्या लक्षात आल्यावर विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार शिक्षण मिळावे, शाळा सोडण्याचे प्रमाण कमी व्हावे आणि ग्रामीण भागातील शिक्षणाला चालना मिळावी, या उद्देशाने केमसेवाडी शाळेत इयत्ता पाचवीचा वर्ग तातडीने सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
पुणे जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत संपूर्ण जिल्ह्यात शाळांच्या इयत्तावाढीची अंमलबजावणी सुरू केली आहे.
या निर्णयानुसार, ज्या शाळांमध्ये आतापर्यंत इयत्ता चौथीपर्यंत वर्ग होते, त्या शाळांमध्ये आता इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे, ज्या शाळांमध्ये इयत्ता सातवीपर्यंत वर्ग होते, त्या शाळांमध्ये आता इयत्ता आठवीपर्यंत वर्ग सुरू करण्यात आले आहेत. तसेच, ज्या माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण दिले जात होते, त्या शाळांमध्ये आता इयत्ता अकरावीचे वर्गही सुरू करण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी दूरवर जावे लागणार नाही. स्थानिक पातळीवरच पुढील शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनाही मोठा दिलासा मिळणार असून, शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास आणि शाळा गळती कमी करण्यासही या निर्णयाचा मोठा हातभार लागणार आहे.
या निर्णयामुळे पालकांनी शिवाजी बुचडे यांचे आभार मानले यामुळे विद्यार्थ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे कारण विद्यार्थ्यांची मोठी पायपीट वाचली आहे एकदा देखील शाळेत जाण्यासाठी तीन चार किलोमीटरची पायपीट करावी लागत होती त्यामुळे याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत जिल्हा परिषद सदस्य शिवाजी बुचडे पाटील यांनी देखील प्रशासनाचे व शिक्षण सभापती विवेक वळसे पाटील यांचे आभार व्यक्त केले यावेळी ते म्हणाले की केमसेवाडीतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पायपिट करावी लागत होती, कासारसाई येथे आठवीपर्यंतच्या वर्गाला मान्यता मिळाली, भोईरवाडी येथे अकरावीच्या वर्गाला मान्यता मिळाली आहे शिक्षणाच्या निगडीत गोष्टीसाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार बैठका व निवेदन दिल्यानंतर प्रशासनाने तात्काळ याच्यावर कारवाई सुरू करून लवकर सुरू करण्याचे आदेश दिले होते अखेर या कामाला आम्हाला यश आले आहे याबद्दल त्यांनी प्रशासनाचे व आभार व्यक्त केले.
जिल्हा परिषद सदस्य शिवाजी बुचडे पाटील यांनी केलेल्या विविध शैक्षणिक मागण्यांना मोठे यश मिळाले आहे. जिल्हा परिषद व प्रशासनाने सेमी इंग्लिश शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून, त्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू आहे.
तसेच, जिल्हा परिषद व शासनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना JEE व NEET परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन मिळावे, या मागणीचीही शासनाने दखल घेत आवश्यक निर्णय घेतला आहे.
याशिवाय, विद्यार्थ्यांमध्ये संवेदना सिविक सेन्स विषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि संविधानातील मूल्यांची माहिती मिळावी यासाठी स्वतंत्र वर्ग सुरू करण्याच्या मागणीलाही जिल्हा परिषदेकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि स्पर्धात्मक शिक्षणाच्या दिशेने मोठी संधी उपलब्ध होणार आहे.