आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागडवेंच्या नियुक्तीची शक्यता

शिंदे राम   446   16-06-2026 11:13:49

Pune 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची मध्यरात्री मुंबईतील 'देवगिरी' या सरकारी निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण आणि तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षातील रिक्त पदे भरण्याबाबत आणि काही पदांवर फेरनियुक्त्या करण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

आगामी निवडणुका आणि पक्षसंघटन बळकट करण्याच्या दृष्टीने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या रात्री उशिरापर्यंत चाललेल्या खलबतांना पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) हे प्रामुख्याने उपस्थित होते. पक्षाच्या आगामी रणनीतीसह संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करण्यावर या नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर राजीनामा द्यावा लागलेल्या रुपाली चाकणकरांचा वारस पक्षाचे निवडला असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागडवेंच्या (NCP Vaishali Nagawade) नियुक्तीची शक्यता झाली आहे.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.