आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Marketing Department Administration: पणनचा कारभार होणार स्वतंत्र

नितीन देशपांडे   127   11-06-2026 12:19:54

Pune 

राज्याच्या पणन विभागात सध्या सहकार विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. मात्र या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा अधिकार सहकार विभागाकडे असल्याने अनेकदा बदली प्रक्रियेत गोंधळ निर्माण होतो.

हा प्रकार टाळण्यासाठी पणन विभागाची स्वतंत्र आस्थापना उभारून महसूल व कृषी विभागातील कार्यक्षम अधिकारी प्रतिनियुक्तीवर घेण्याबाबतचा शासन निर्णय अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पणन विभागातील पणन संचालक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव तसेच इतर पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या पणन मंत्र्यांना विश्वासात न घेता नुकत्याच करण्यात आल्याची चर्चा होती. या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गडबड झाल्याची चर्चा सहकार व पणन विभागात रंगली होती.

या पार्श्वभूमीवर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पणन संचालकांसह वादग्रस्त ठरलेल्या पाच बदल्यांना स्थगिती देण्यात आली.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.