आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Property Tax पिंपरी-चिंचवडमध्ये शास्तीकर माफीचा मोठा दिलासा

नितीन देशपांडे   44   11-06-2026 12:13:27

Pune 

पिंपरी-चिंचवड शहरातील सन 2023 पूर्वी झालेल्या अनधिकृत बांधकामांना लावण्यात आलेला शास्तीकर (दंड) राज्य सरकारने माफ केल्यानंतर आतापर्यंत 96 कोटी 12 लाख रुपयांचे समायोजन केले आहे

चालू 2026-27 या वर्षात 22 हजार 906 मालमत्ताधारकांच्या रकमेचेही मालमत्ताकरामध्ये समायोजन करण्यास स्थायी समितीने बुधवारी (दि.10) मान्यता दिली आहे.

शहरातील अनधिकृत बांधकामांना सन 2012-13 पासून शास्तीकर वसूल केला जात होता. राज्य शासनाने तीन मार्च 2023 ला शहरातील अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर माफीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, 3 मार्च 2023 पूर्वी झालेल्या 25 हजार 673 अनधिकृत बांधकामांना याचा लाभ मिळाला. या मालमत्ताधारकांनी शास्तीकराची 260 कोटी 53 लाख रुपयांची रक्कम महापालिकेकडे जमा केली होती.

शास्तीकर माफीचा निर्णय झाल्यानंतर सन 2023-24 मध्ये 22 हजार 512 मालमत्ताधारकांना 30 कोटी 3 लाख रुपये, सन 2024-25 मध्ये 25 हजार 673 मालमत्ताधारकांना 35 कोटी 95 लाख रुपये, सन 2025-26 मध्ये 21 हजार 824 मालमत्ताधारकांना 30 कोटी 14 लाख असे एकूण 96 कोटी 12 लाख रुपयांची रक्कम मालमत्ताकरामध्ये समायोजित करण्यात आली. त्यानंतरही 22 हजार 906 मालमत्ताधारकांची 164 कोटी 41 लाख रुपयांची रक्कम मालमत्ताकरामध्ये समायोजित करणे बाकी आहे. त्यानुसार, सन 2026-27 या आर्थिक वर्षात 164 कोटी 41 लाखांपैकी जेवढी शक्य आहे, त्यानुसार ती रक्कम समायोजित केली जाणार आहे. या समायोजनेला स्थायी समितीने आज मान्यता दिली आहे, अशी माहिती महापालिकेचे करसंकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी दिली.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.