आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

शिक्षकांच्या १३ हजार जागांसाठी भरती; जाणून घ्या संपूर्ण भरती प्रक्रिया

शरद लाटे  411   07-06-2026 08:33:24

Pune शिक्षकांच्या नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. अनेक महिन्यांपासून रखडलेली शिक्षक भरती प्रक्रियेला आता वेग आला आहे. राज्यात १३ हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. पवित्र पोर्टलद्वारे ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांना ३१ मे २०२६ पर्यंत त्यांच्या रिक्त पदांच्या जाहिराती 'पवित्र' पोर्टलवर प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची हजारो रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. शिक्षण विभागाने केवळ सध्या रिक्त पदेच नव्हे, तर मे २०२६ अखेरपर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या संभाव्य जागांचाही समावेश करण्याचा निर्णय घेतलाय.

राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी सक्तीची; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची मान्यता होणार रद्द

१ ते ३१ मे या कालावधीत सर्व शाळांनी रिक्त पदांची माहिती पोर्टलवर नोंदवणे बंधनकारक करण्यात आलंय. त्यानंतर जूनमध्ये पात्र उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार शाळांचे पसंतीक्रम भरण्याची संधी मिळणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होणार असल्याने सर्व प्रक्रिया पारदर्शक असणार असल्याचा दावा करण्यात येणार आहे.

मुलाखतीविना शिक्षक भरती होणार

'पवित्र' पोर्टलमार्फत भरती प्रक्रिया राबवून वशिलेबाजीला आळा घालण्यात येईल, असा दावा शासनाकडून करण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांची भरती पूर्णपणे गुणवत्तेनुसार आणि मुलाखतीशिवाय होणार आहे. मात्र खासगी संस्थांना प्रत्येक जागेसाठी दहा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्याची मुभा देण्यात आलीय.

सतराशे तलाठ्यांची भरती 'एमपीएससी'कडून

राज्यात तब्बल १,७०० तलाठी पदांची भरती 'एमपीएससी'कडून होणार असून, यासाठी प्रत्येक विभागीय कार्यालयाकडून मागणी पत्र मागवण्यात आले आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेला वेग येणार आहे. शासन निर्णयानुसार, जिल्हानिहाय रिक्त जागांचा अहवाल तयार करण्यात येत आहे


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.