आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

प्राध्यापकाकडून सात लाख रुपयांची खंडणी उकळल्याचे प्रकरण; सोनाली हिंगे हिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

नितीन देशपांडे   214   05-06-2026 11:22:49

Pune 

एका पॉलीटेक्निक महाविद्यालयातील प्राध्यापकाकडून सात लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणातील महिला पोलीस सोनाली हिंगे हिचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. वाय लाडेकर यांनी फेटाळला.

एप्रिल 2026 मध्ये बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी हिंगे यांनी न्यायालयात अर्ज केला होता. सरकार पक्षातर्फे ॲड. सुनील हांडे यांनी जामिनास विरोध करत, हिंगे ही दामिनी पथकातील सदस्य असून अन्य दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह खंडणी प्रकरणातील सहआरोपी असल्याचे सांगितले.

प्राध्यापकाकडून उकळलेल्या ७ लाख रुपयांपैकी १ लाख रुपये तिच्याकडे गेल्याचा आरोप असून, ती रक्कम आणि बनावट अर्ज तयार करण्यासाठी वापरलेला लॅपटॉप जप्त करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणात इलेक्ट्रॉनिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि बनावट अर्जाबाबत अधिक तपास आवश्यक असल्याने अर्जदाराची कोठडीत चौकशी गरजेची असल्याचा युक्तिवाद सरकार पक्षाने केला. तसेच, नोटीस देऊनही हिंगे तपासात सहकार्य करत नसल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. सरकार पक्षासह बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने हिंगे हिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.