आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

फडणवीसांचे 'संकटमोचक' संजय काकडेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

शरद लाटे  319   01-06-2026 13:23:30

Pune 

पुण्याच्या राजकारणात एक मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि संकटमोचक संजय काकडे यांनी त्यांचे चिरंजीव विक्रम यांच्यासह राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

संजय काकडे यांच्या या ‘सीमोल्लंघनामुळे’ पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी “माझ्या स्वतःच्या पक्षातील लोकांचा जर माझ्यावर विश्वास नसेल, तर माझे त्यांच्याशी काही देणेघेणे नाही,” असे म्हणत भाजपमधील अंतर्गत गटबाजीवर बोट ठेवले होते. अखेर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपला निर्णय कळवत राष्ट्रवादीची वाट धरली.

प्रवेशामागचा ‘राजकीय अँगल’ आणि मोठी गणिते

संजय काकडे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाचे महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत. संजय काकडे हे पुण्याच्या राजकारणातील ‘किंगमेकर’ आणि जोडतोडीच्या राजकारणासाठी प्रसिद्ध आहेत. 2017 च्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजपचे 90 हून अधिक नगरसेवक निवडून आणण्यात काकडेंच्या मॅनेजमेंटचा मोठा वाटा होता. आता काकडे राष्ट्रवादीत गेल्यामुळे पुण्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि आगामी निवडणुकांमध्ये भाजपला त्यांच्याच रणनीतीचा फटका बसू शकतो.

देवेंद्र फडणवीसांसाठी वैयक्तिक धक्का

संजय काकडे हे थेट देवेंद्र फडणवीस यांचे ‘संकटमोचक’ म्हणून ओळखले जात होते. भाजपमध्ये अंतर्गत वाद मिटवणे असो किंवा इतर पक्षांतील बडे नेते भाजपमध्ये आणणे, ही कामे फडणवीस काकडेंवर सोपवायचे. अशा अत्यंत खास्या माणसाने साथ सोडणे हा फडणवीसांसाठी पुण्यात मोठा राजकीय फटका मानला जात आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील ‘मराठा’ समीकरणांवर परिणाम

संजय काकडे हे मराठा समाजातील एक बडा आणि उद्योजक चेहरा आहेत. सध्या राज्यात सुरू असलेल्या आरक्षणाच्या आणि राजकीय वातावरणात, काकडेंसारखा नेता राष्ट्रावादीत गेल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा मतदार आणि समीकरणांवर परिणाम होईल असे बोलले जात आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.