आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

NCP Politics : प्रफुल पटेल शरद पवारांना भेटले! तटकरेंच्या भेटीवेळी पटेलही

नितीन देशपांडे   238   16-05-2026 11:55:27

Pune update 

12 मे रोजी सुनील तटकरे यांनी भेट घेतली होती. तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना वेळ घेत ही भेट घेतल्याचे सांगितले होते. तसेच याचा राजकीय अर्थ न काढण्याचे संकेत दिले होते.

दरम्यान, या भेटीनंतर आता प्रफुल पटेल हे देखील शरद पवारांना भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. याविषयी 'साम टिव्ही'ने सुत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.

12 मे रोजी सुनील तटकरे यांच्यसोबत प्रफुल पटेल हे देखील शरद पवारांना भेटले, असे साम टिव्हीने आपल्या वृत्तात म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जे निवडणूक आयोगाला पत्र दिले होते. त्या पत्रामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या पदाचा उल्लेख नव्हता. त्यानंतर त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

शरद पवारांच्या पक्षाची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांची बैठक नुकतीच पुण्यात पार पडल्याचे समोर आले आहे.या बैठकीचा फोटो समोर आला असून या बैठकीला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते अशी माहिती आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.