आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

पुणे जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी मिलिंद वाळंज यांची निवड

शिंदे राम   952   08-05-2026 22:21:55

पुणे (प्रतिनिधी) : पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी श्री. मिलिंद नंदकुमार वाळंज यांची निवड करण्यात आली.

पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या उपस्थितीत निवडीची घोषणा करण्यात आली. 

यावेळी महिला व बालकल्याण सभापती अंकिता पाटील, दीपाली हुलावळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश बापू कोंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते श्रीमंत ढोले, ज्येष्ठ नेते तथा जिल्हा परिषद सदस्य शांतारामदादा इंगवले, सभापती अमोल नलावडे, सभापती जितेंद्र बडेकर तसेच सर्व पक्षांचे जिल्हा परिषद सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही संघटना २२ राज्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हक्कांसाठी कार्यरत असून भ्रष्टाचार रोखण्यासाठीही तत्परतेने कार्य करत आहे,

नवनिर्वाचित अध्यक्ष मिलिंद वाळुंज यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत दौरे करून संघटनेचे काम तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला, तालुकास्तरावरील अडीअडचणी समजून घेऊन समाजसेवा हा संघटनेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

लवकरच राज्यातील १२ जिल्हा परिषद अध्यक्षांची बैठक ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्याच्या लोकप्रिय उपमुख्यमंत्री सुनिञावहिनी पवार यांच्या उपस्थितीत होणार असून सदस्यांचे अधिकार व विकास निधी वाढवण्यासाठी भोर-राजगड-मुळशीचे लोकप्रिय आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या समवेत सरकारकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे यावेळी मिलिंद वाळंज आहे म्हणाले.

वाळंज यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा करत एकमेकांना पेढे भरवत आनंद उत्सव साजरा केला.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.